सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात एक आई आपल्या लगान मुलाला बेदम मारहाण करत असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये दिसते की, महिला मुलाच्या छातीवर बसली असून त्याला बेदम मारहाण करत आहे. त्याचे डोकं जमिनीवर आपटत आहे. त्याला बुक्क्या मारत आहे. मध्येच त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मुलगा आईच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगा धडपडत आहे. आईकडे पाणी मागत असून आपल्या जीवाची भीक मागत आहे. मात्र हैवान बनलेल्या आईला मुलावर कोणतीच दया आली नाही. व्हायरल व्हिडिओची माहिती घेतल्यानंतर समजले की, ही घटना हरिद्वार जवळच्या झबरेडा गावातील असून हा व्हिडिओ दोन महिन्याच्या आधीचा आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला तिच्याच पोटच्या गोळ्याला बेदम मारहाण करताना आणि त्याचा गळा दाबताना दिसत आहे.व्हिडीओ पाहून लोकांनी महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओची माहिती घेत पोलीस जेव्हा महिलेपर्यंत पोहोचले तेव्हा मारहाणीचे कारण ऐकून सुन्न झाले. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की, या घटनेबाबत महिलेवर कडक कारवाई करवाई की, तिला पीडित मानून तिचा मदत करावी. व्हायरल व्हिडिओबाबत महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा आपल्या पतीसोबत गेल्या १० वर्षापासून वाद सुरू आहे. पती तिच्यासोबत रहात नाही व मुलाचा कोणताही खर्च देत नाही. मागील अनेक महिन्यांपासून तो घरी आला नाही.
महिला एका दुकानात काम करून मोठ्या मुश्किलीने घर चालवत आहे. तिने आपल्या पतीला घाबरवण्यासाठी व घराची जबाबदारी त्याने घ्यावी या उद्देश्याने तिने मोठ्या मुलाच्या सहाय्याने हा व्हिडिओ बनवला व पतीला पाठवला होता. २ महिन्यापूर्वी हा व्हिडिओ महिलेने बनवला होता. त्यानंतर पतीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. महिलेने म्हटले की, तिने मुलाच्या छातीवर केवळ डोकं ठेकवलं होतं. तिने त्याला कोणताही चावा घेतला नव्हता व त्याला इजा पोहोचवली नव्हती.
महिलेचा मुलाला मारतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी सांगितले की, महिलेचा तिच्या पतीसोबत वाद सुरू आहे. तिचा पती ना घरी येतो ना उदरनिर्वाहासाठी पैसे देतो. त्यामुळे पतीला घाबरवण्यासाठी तिने हा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या