Viral News: सोशल मीडियावर दररोज नवीन व्हिडिओ पाहायला मिळताात. लोक लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, हे सांगता येत नाही. यातील काही व्हिडिओ लोकांचे मनोरंजन करणारे ठरतात. तर, काही व्हिडिओ नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी ठरतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात एक महिला मुलासोबत रील बनवत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ अश्लील असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये असल्याचे दिसत आहे. तिच्या बाजुला एक मुलगा उभा आहे. व्हिडिओत दिसत आहे की, मुलगा त्या महिलेला आधी ढकलतो. यानंतर तो तिचे चुंबन घेतो. त्यानंतर ही महिला मुलाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेते. शेवटी मुलगा त्या महिलेला उचलून घेतो. यानंतर महिला आरडाओरडा करते. या व्हिडिओत दोघेही आनंदात दिसत आहेत.
@charusharma01080 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, 'मुलगा मोठा झाला आहे.' दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'थोडी तरी लाज ठेवा.' तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'या वयातील मुलांना मार्गदर्शन करण्याऐवजी त्यांना चुकीच्या मार्गावर नेले जात आहे, हे चुकीचे आहे.' आणखी एका युजरने म्हटले आहे की, 'महिलेने अशा पद्धतीने आपल्या मुलाचे संगोपन केले तर, तो मोठा झाल्यानंतर खूप चुकीच्या गोष्टी करेल.' एका युजरने म्हटले आहे की, 'सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल, याचा काही नेम नाही.'
तीन महिन्यांपूर्वी मुलीचा अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर सेलने तरुणाचा शोध घेऊन त्याला अटक केली. भरठाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी इन्स्पेक्टर देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, 24 जून 2024 रोजी पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणाने एसएसपी संजय वर्मा यांच्याकडे तक्रार दिली. आपल्या २० वर्षीय बहिणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून अश्लील फोटो व्हायरल केल्याचा आरोप त्याने केला. एसएसपींनी हा तपास सायबर सेलच्या प्रभारीकडे सोपवला. पुरावे गोळा केल्यानंतर ब्यावर मैनपुरी येथील रहिवासी विवेक शाक्य याच्याविरोधात विविध कलमान्वये आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करून रविवारी तुरुंगात पाठविण्यात आले.
संबंधित बातम्या