मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Crime: आईसोबतचा शारीरिक संबंधाचा व्हिडिओ मुलीला दाखवला; व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार

Crime: आईसोबतचा शारीरिक संबंधाचा व्हिडिओ मुलीला दाखवला; व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 11, 2023 02:55 PM IST

Man Rapes Mother And daughter: अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आईसह तिच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

REPRESENTATIVE IMAGE
REPRESENTATIVE IMAGE (HT_PRINT)

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक धक्कादायक घटना घडली. शाररिक संबंधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एका व्यक्तीने एका महिलेसह तिच्या मुलीलाही वासनेची शिकार बनवले. अखेर वैतागून पीडित महिला आणि तिच्या मुलीने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेतील आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी आरोपीने तिची फसवणूक करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अनेक महिने असा प्रकार सुरु होता. यानंतर आरोपीची वाईट नजर महिलेच्या मुलीवर पडली.

आरोपीने हा व्हिडिओ पीडित महिलेच्या मुलीलाही दाखवला. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या अश्लील व्हिडिओद्वारे आरोपी कधी महिलेवर तर कधी तिच्या मुलीवर अत्याचार करत असे. बदनामीच्या भितीने पीडित महिला आणि तिची मुलगी गेल्या अनेक महिन्यांपासून अत्याचार सहन करत होते. अखेर वैतागून महिलेले तिच्या सोबत घडलेला संपूर्ण प्रकार नातेवाईकांना सांगितला.

यानंतर कुटुबियांनी पीडित महिला आणि तिच्या मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी आरोपीविरोधात ब्लॅकमेल, पॉस्को कायदा आणि बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. या घटनेतील आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

WhatsApp channel

विभाग