मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  घरात घुसलेल्या चोराला माय-लेकीनं पिटाळलं, बंदुकही घेतली हिसकावून; CCTV त कैद झालं दोघींचं साहस

घरात घुसलेल्या चोराला माय-लेकीनं पिटाळलं, बंदुकही घेतली हिसकावून; CCTV त कैद झालं दोघींचं साहस

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 23, 2024 04:10 PM IST

Viral Video : मायलेकीच्या शौर्याने चोरांचा प्लान फेल केला तसेच आरोपींनाही पकडले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

घरात घुसलेल्या चोराला माय-लेकीनं पिटाळलं
घरात घुसलेल्या चोराला माय-लेकीनं पिटाळलं

तेलंगाणा राज्यातीलहैदराबाद शहरात एका मायलेकीच्या शौर्याने चोरांचा प्लान फेल केला तसेच आरोपींनाही पकडले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आई व मुलीची बहादुरी दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एफआयआर नोंद करून दोन आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निरीक्षणात बेगमपेट पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सिकंदराबादमधील बेगमपेट पोलीस ठाणे परिक्षेत्रात एका घरात दोन व्यक्ती हातात बंदूक घेऊन व डोक्यावर हेल्मेट घालून चोरीच्या उद्देश्याने घुसले होते. त्यानंतर त्यांनी घरातील लोकांनी बंदुकीचा धाक दाखवून दाग-दागिने व पैशांची मागणी करू लागले. त्यावेळी घरातील महिला व मार्शल आर्टमध्ये कुशल अमिता महनोत आणि तिच्या मुलीने हल्लेखोरांचा विरोध मोडित काडून त्यांच्यावरच हल्ला केला.

आरोपींची ओळख पटली -

माय लेकीचा रुद्रावतावर पाहून चोर घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींची ओळख पटली असून सुशील कुमार आणि प्रेमचंद अशी नावे आहेत. दोघांना अटक करून त्यांना न्यायालयात दाखल केले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून चोरीसाठी वापरात असलेले साहित्य व शस्त्रे जप्त केली आहेत.

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, चोर जबरदस्तीने घरात घुसले होते. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून मौल्यवान वस्तुंची मागणी करू लागले. मात्र आई व मुलीच्या बहादुरीने चोरांचा प्लान फेल केला. चोरांच्या हल्ल्यात माय-लेकीला कोणतीही दुखापत झालेली नाही.

IPL_Entry_Point

विभाग