मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Masood Azhar Killed : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहर पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात ठार?

Masood Azhar Killed : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहर पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात ठार?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 01, 2024 06:12 PM IST

Masood Azhar News : भारताचामोस्टवॉन्डेट दहशतवादी वजैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरसोमवारी एका बॉम्ब स्फोटात ठार झाल्याचे वृत्त सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

Masood Azhar
Masood Azhar

Masood Azhar Killed : नव्या वर्षातील पहिल्या दिवशी संपूर्ण देशासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.भारताचामोस्टवॉन्डेट दहशतवादी वजैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहरसोमवारी एका बॉम्ब स्फोटात ठार झाला आहे.सांगितले जात आहे की,मसूद अझहर बॉम्ब स्फोटात मारला गेला आहे. ही घटना सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र लोक सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

 

Masood Azhar
Masood Azhar

मिळालेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रमुख मसूद अझहर सोमवारी पहाटे ५ वाजता बहावलपूर मशिदीकडे जात असताना अज्ञात लोकांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडला. मात्र याची अधिकृत पुष्टि करण्यात आलेली नाही. मौलाना मसूद अझहर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख होता. पाकिस्तानमधील काही मीडिया रिपोर्टनुसार  मोस्ट वाँटेड दहशतवादी, कंधाहार अपहरणकर्ता मौलाना मसूद अझहर भावलपुर मशिदीकडे जात असताना बॉम्बस्फोटात मारला गेला.

मसूद अझहर खालील प्रकरणात भारताला मोस्ट वाँटेड होता -

  • दिल्ली पोलिसांकडून २००१ संसद हल्ला आणि पंजाब पोलिसांकडून २०१६ मध्ये पठानकोट एअरबेस हल्ला प्रकरणात आरोप-पत्र दाखल केले होते. 
  • अझहरने भारतात दहशतवादी हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मद केडरचा वापर केला. त्यामध्ये ५ जुलै २००५ रोजी अयोध्यामध्ये राम जन्मभूमी मंदिरावरील हल्ल्याचाही समावेश आहे.  
  • १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सीआरपीएफ जवानावंर पुलवामा हल्ला. 
  • मसूदने जानेवारी २०१६ मध्ये अफगाणिस्तानमधील बाल्क येथे मझार-ए-शरीफमध्ये भारतीय दुतावासांवर हल्ल्याचे निर्देश दिले होते.
  • मसूद अझहर अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेन आणि तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर यांचा निकटवर्तीय मानला जात होता. 

 

WhatsApp channel