burkina faso mass killings : पश्चिम आफ्रिकेच्या बुर्किना फासो या देशातील बार्सालोघो शहरात अल कायदाशी संबंधित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काही तासांतच सुमारे ६०० नागरिकांची हत्या करनेत आली. मृतांमध्ये बहुतांश मुले आणि महिलांचा समावेश आहे. २४ ऑगस्ट रोजी खंदक खोदत असताना बारसालोघे येथील रहिवाशांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. आतापर्यंतचे हे सर्वात मोठे हत्याकांड होते. दहशतवादाविरोधात लष्कराला पाठिंबा देऊ नका, असा इशारा अल-कायदाने नागरिकांना दिला होता. लष्कराच्या आदेशानुसार नागरिक खड्डे खोदत होते, यामुळे हे हत्याकांड करण्यात आलं.
मालीशी संलग्न असलेल्या आणि बुर्किना फासोमध्ये सक्रिय असलेल्या जमात नुसरत अल-इस्लाम वाल-मुस्लिमीन (जेएनआयएम) च्या दहशतवाद्यांनी बाईकवरून बारसालोघोच्या बाहेरील भागात प्रवेश करताना गावकऱ्यांवर गोळ्या झाडल्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजे मृतांची संख्या २०० आहे, परंतु जेएनआयएमने दावा केला आहे की त्यांनी तब्बल ३०० नागरिकांची हत्या केली. तर फ्रान्स सरकारने शुक्रवारी मृतांची संख्या ६०० वर पोहोचल्याचे स्पष्ट केलं. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. देशाच्या इतिहासातील हा सर्वात भीषण नरसंहार आहे. अल कायदा आणि इस्लामिक स्टेट शी संबंधित बंडखोरांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
मालीत राहणाऱ्या आणि बुर्किना फासोमध्ये सक्रिय असलेल्या नुसरत अल-इस्लाम वाल-मुस्लिमीन (जेएनआयएम) या अल-कायदाशी संबंधित संघटनेच्या सदस्यांनी बारसालोघोच्या बाहेरील भागात गावकऱ्यांवर गोळ्या झाडल्या. .
एका व्यक्तीने सांगितले की, लष्कराने खंदक खोदण्यास सांगितलेल्या डझनभर लोकांपैकी तो एक होता. त्याने सीएनएनला सांगितले की, सकाळी ११ च्या सुमारास तो शहरापासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर एका खड्ड्यात होता. त्यावेळी त्याला पहिल्या गोळीचा आवाज ऐकू आला. तो म्हणाला, "मी पळून जाण्यासाठी खड्ड्यात झोपलो. मात्र, हल्लेखोर नागरिकांचा पाठलाग करत असल्याचे दिसत होते. त्यामुळे मी लपून बाहेर पडलो. यावेळी हल्लेखोरांनी अनेक नागरिकांना ठार मारलं होतं. सर्वत्र मृतदेहाचा खच पडला होता. तर जखमी लोक मदतीसाठी ओरडत होती. मी एका झाडाखाली झोपून मेल्याचं नाटक केलं. दुपार पर्यंत हल्लेखोर जाई पर्यंत मी तसाच झोपून होतो.
दुसऱ्या बचावलेल्या व्यक्तीने सांगितले की, जेएनआयएमने दिवसभर लोकांना ठार मारले. तीन दिवस आम्ही मृतदेह गोळा करत राहिलो. सगळीकडे मृतदेह विखुरलेले होते. दफनविधीच्या वेळी इतके मृतदेह जमिनीवर पडले होते की त्यांना दफन करण्यासाठी जागा देखील कमी पडत होती. दहशतवाद्यांपासून शहराचे रक्षण करण्यासाठी लष्कराने स्थानिकांना शहराभोवती मोठे खंदक खोदण्याचे आदेश दिले आहेत. जेएनआयएमने नागरिकांना बंडखोरीविरोधातील लढाईत लष्कराला पाठिंबा न देण्याचा इशारा दिला आहे.
संबंधित बातम्या