मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ramadan Eid 2023 : देशातील अनेक शहरांमध्ये दिसला ‘चांद’, भारतात उद्या साजरी होणार रमजान ईद

Ramadan Eid 2023 : देशातील अनेक शहरांमध्ये दिसला ‘चांद’, भारतात उद्या साजरी होणार रमजान ईद

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 21, 2023 08:32 PM IST

Ramadan Eid 2023 : मध्यपूर्वेतील देशांमध्ये आज रमजान ईद साजरी करण्यात आली. आज भारतीय उपखंडात चंद्रदर्शन झाल्यामुळं उद्या भारतात ईद साजरी केली जाणार आहे.

Ramadan Eid 2023 In India
Ramadan Eid 2023 In India (HT)

Ramadan Eid 2023 In Maharashtra : मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण असलेल्या रमजान महिना आज संपला आहे. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये उद्या रमजान ईद साजरी केली जाणार आहे. गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम बांधवांनी 'रोजे' म्हणजेच उपवास ठेवत स्पेशल 'तरावीह' नमाज अदा केली होती. रमजान महिन्याच्या २९ व्या दिवशीच चंद्रदर्शन झाल्यामुळं ३० व्या दिवशी म्हणजेच उद्या रमजान ईद साजरी केली जाणार आहे. त्यामुळं मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये ईदचा मोठा उत्साह पाहायला मिळणार आहे.

इस्लामी कॅलेंडरनुसार मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा महिना अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात मुस्लिमांसाठी नमाज आणि उपासनेचं फळ सर्वात जास्त असतं, अशी कुराणमध्ये धारणा आहे. २४ मार्चपासून रमजानचा महिना सुरू झाला होता. त्यानंतर आता २१ एप्रिलला भारतासह बांगलादेश आणि पाकिस्तानात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमधील मशिदींमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळं मुस्लिमांची अनेक धार्मिक स्थळं उजळून निघाली आहे.

Sharad Pawar : ‘गुजरात दंगलीतील आरोपींना सोडणं ही संविधानाची हत्या’, शरद पवारांचा थेट मोदी-शहांवर आरोप

रमजानमध्ये दानधर्माला प्रचंड महत्त्व...

मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यात 'जकात' म्हणजे दानधर्माला प्रचंड महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं अनेक लोक या महिन्यात गोरगरिब आणि गरजूंना आर्थिक मदत तसेच अन्नधान्याचं दान करत असतात. याशिवाय 'रोजा, नमाज, हज आणि जकात' या तत्वांनाही रमजानच्या महिन्यात फार महत्त्व आहे. त्यामुळं अनेक लोक उपवास ठेवत हज यात्रेसाठी सौदी अरेबियात जात असतात. त्यामुळं आता उद्या भारतीय उपखंडाच रमजान ईद साजरी होणार असल्यामुळं अनेक शहरांमध्ये या सणाचा उत्सव पाहायला मिळत आहे.

IPL_Entry_Point