Viral News: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, याचा नेम नाही.अशाच एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या व्हिडिओत एक माकडीन एखाद्या गृहिणीसारखे घरातील सर्व काम करते. भांडी धुण्यापासून ते ब्रेड बेक करण्यापर्यंतची सर्व कामे राणी घरच्यांसोबत मिळून करते. या माकडीनचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक झाले आहेत.
खगीपूर सदवा हे उत्तर प्रदेश येथील रायबरेली शहरापासून काही किलोमीटर अंतरावर वसलेले गाव आहे. सुमारे ८ वर्षांपूर्वी गावात आलेले राणी नावाचे माकड आज सर्वांचे आवडते बनले आहे. टिकटॉकपासून युट्युबपर्यंत या माकडीनच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंत जात आहे. तिची काळजी घेणाऱ्या अशोकने सांगितले की, हिमाचलमध्ये काम करून ८ वर्षांपूर्वी जेव्हा तो गावात आला, तेव्हा त्याला राणी घरात दिसली. घरात जसे सर्वजण आपापली कामे करत होते, तशीच राणीही त्यांच्यासोबत जवळून काम करते. जेव्हा घरातील स्त्रिया भाकरी बनवतात, तेव्ही ती त्यांना मदत करते. एवढेच नव्हेतर ती भांडी धुण्यासह मसाला देखील वाटते. महत्त्वाचे म्हणजे ही माकडीन गावातील कोणाच्याही घरी राहते आणि त्यांना कामात मदत करते. गावातील प्रत्येकजण या माकडीनवर प्रेम करतो.
या माकडीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतपर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. एका गावकऱ्याने सांगितले की, त्यांच्या घरात जे काही आहे, ते सर्व राणी नावाच्या माकडीनमुळे आहे. आईच्या मृत्युनंतर राणीला मोठा धक्का बसला होता. आता ती आपल्या वहिनीसोबत राहते, असे त्याने सांगितले आहे. राणीला राग आला तर, दुसऱ्याला इजा करण्याऐवजी स्वत:च्या हाताचा चावा घेते. अशा अवस्थेत तिला पाहिल्यानंतर गावकरी समजतात की, तिला राग आला आहे आणि तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करतात.
संबंधित बातम्या