Maha Kumbh 2025: प्रयागराजच्या आगमनाने महाकुंभाची व्हायरल गर्ल मोनालिसाचे नशीब उजळले आहे. आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा आता बॉलिवूडच्या चित्रपटात झळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोनालिसाला त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी साइन केले आहे. या चित्रपटात दोन अभिनेत्रींसोबत मोनालिसादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'द डायरी ऑफ मणिपूर' या आगामी चित्रपटासाठी मोनालिसाची निवड केल्याची माहिती दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी दिली. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असून मोनालिसा या दोन नायिकांमध्ये सामील होणार आहे. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, मोनालिसाच्या साधेपणाने प्रभावित होऊन त्यांनी तिला आपल्या चित्रपटात संधी देण्याचा निर्णय घेतला. ‘मी मोनालिसा आणि तिच्या कुटुंबियांना त्यांच्या घरी भेटलो. त्यांनी मोनालिसाला माझ्या चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे.’
मोनालिसाने आयुष्यात कधीच अभिनय केला नाही, हे खरे आहे, पण तिने ते एक आव्हान म्हणून स्वीकारले आहे. मोनालिसाला अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये ती चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे. आजकाल स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक तरुणी सोशल मीडियावर अश्लील रील्स बनवत आहेत. मी लोकांना सांगू इच्छितो की, गरीब कुटुंबातील मोनालिसासारखी साधी मुलगीदेखील मनोरंजन उद्योगात उत्कृष्ट कामगिरी करू शकते, मिश्रा यांनी म्हटले आहे.'
सनोज मिश्रा हे लखनौमधील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत. जवळपास तीन दशके सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना सनोज यांनी जवळपास १५ चित्रपट केले आहेत. २०२३ साली दिग्दर्शक सनोज मिश्रा हे द डायरी ऑफ वेस्ट बंगाल हा चित्रपट बनवून प्रकाशझोतात आले होते. त्यासाठी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी पश्चिम बंगालची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते.
यानंतर ते अचानक गायब झाला. सनोज बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची पत्नी ध्रुती मिश्रा यांनी लखनौच्या गोमतीनगर विस्तार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्याच्या पत्नीने सांगितले होते की, कोलकाता पोलिसांनी त्याला चित्रपटाच्या संदर्भात चौकशीसाठी कोलकात्याला बोलावले होते. १४ ऑगस्ट रोजी ते आपल्या पुतण्यासोबत विमानतळाकडे रवाना झाले. तेथून ते गुवाहाटी आणि नंतर कोलकाता येथे पोहोचले. परंतु १५ ऑगस्ट रोजी त्यांचा फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
यानंतर तो वाराणसीच्या अस्सी घाटात सापडले. त्यानंतर त्यांना पत्नीच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर सनोजने पोलिसांना सांगितले होते की, त्याला चित्रपटाविषयी चौकशी होण्याची भीती वाटत होती. त्यांना अटकेची भीती वाटत होती. त्यामुळे त्याने कोलकात्यात मोबाइल तोडून फेकून दिला आणि ट्रेनने वाराणसीला गेले.
संबंधित बातम्या