Mona Lisa Viral News: आपल्या सौंदर्यामुळे रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या मोनालिसाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एका इन्फ्लुएंसरला दिलेल्या मुलाखतीत मोनालिसाने धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ती जिथे जाईल, तिथे लोक गर्दी करत आहेत आणि तिच्यासोबत फोटो व्हिडीओ काढण्याचा आग्रह धरत आहे. यामुळे ती वैतागली आहे. अलिकडेच काही लोक जबरदस्तीने तिच्या तंबूत घुसले आणि तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला आहे. याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांनी काहीही सांगितले नाही.
मोनालिसा दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी काही तरुण तिच्या तंबूत घुसले आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी जबरदस्ती करू लागले, असा तिने आरोप केला आहे. त्या तरुणांनी मोनालिसाला सांगितले की, तुझ्या वडिलांनी आम्हाला तुझ्यासोबत फोटो काढण्यासाठी पाठवले आहे, असे सांगितले. पण तिने स्पष्ट नकार दिला. तेवढ्यात मोनालिसाचे वडील तिथे पोहोचले आणि त्या तरुणांना तुम्ही आत कसे घुसले, असा जाब विचारला. तिने आपल्या वडिलांना विचारले की, तुम्ही यांना पाठवले होते का? तर त्यांनी नाही असे उत्तर दिले. यामुळे माझ्या भावाने त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला असता तरुणांनी त्याला मारहाण केली. आता मला भिती वाटते की, येथे कोणी तर नाही ना? कोणी काही करणार नाही. इथे लाईट नाही, काहीच नाही, तरीही लोक जबरदस्तीने तंबूत घुसतात, अशी भिती तिने व्यक्त केली.
प्रसिद्ध झाल्यापासून लोक त्यांच्याकडे फोटो आणि मुलाखतीसाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर विशेष परिणाम झाला आहे. अलीकडेच त्याच्या वडिलांनी त्याला घरी पाठवल्याची ही बातमी आली होती. मात्र, नंतर मोनालिसाच्या आजोबांनी ती महाकुंभमेळ्यात असल्याचे सांगितले होते.
पौष पौर्णिमेच्या स्नानाने १३ जानेवारीला प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ ला सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी महाकुंभाच्या पहिल्या अमृतस्नान सोहळ्यात अपेक्षेपेक्षा सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी पवित्र संगमात डुबकी मारली. आतापर्यंत 9 कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात डुबकी लावली आहे. महाकुंभातील सर्वात मोठा स्नानसोहळा मौनी अमावास्येची जय्यत तयारी सुरू आहे. प्रयागराज रेल्वे डिव्हिजनने मौनी अमावस्येच्या दिवशी कोट्यवधी भाविकांसाठी १५० हून अधिक मेळा स्पेशल ट्रेन चालवण्याची योजना तयार केली आहे, जी भारतीय रेल्वेसाठी स्वतःच एक विक्रम असेल.
संबंधित बातम्या