
DGHS Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. आरोग्य सेवा महासंचालनालयात विविध पदांसाठी अर्ज मागिवले जात आहेत. अर्ज प्रक्रियेला १० ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात झाली. इच्छुक उमेदवार आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अधिकृत पोर्टल hlldghs.cbtexam.in वर जाऊन उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
देशाच्या आरोग्य सेवा महासंचालनालया अंतर्गत ६४ पदांवरील तब्बल ४८७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२३ आहे.संगणक आधारित परीक्षेत ६० प्रश्नांचा एक पेपर असेल. प्रत्येक प्रश्नाला ४ गुण असतील. परीक्षेसाठी ६० मिनिटांचा कालावधी असेल. सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील. इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये घेतली जाईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण निगेटिव्ह मार्किंग असेल.
आरोग्य सेवा महासंचालनालयामधील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. उमेदवार दहावी/ बारावी/ आयटीआय/ पदवी पदानुसार संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा प्राप्त असावा. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षाचा असावा. एससी, एसटी आणि ओबीसी यांना वयात सवलत दिली जाईल.
- आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अधिकृत पोर्टल hlldghs.cbtexam.in वर भेट द्यावी.
- मुख्यपृष्ठावरील नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक असलेली माहिती टाकून नोंदणी करा.
- लॉगिन वर क्लिक करा आणि इतर माहिती भरा.
- अर्जाची प्रिंट आउट काढून स्वत:जवळ ठेवावी.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी, ईडब्लूएस वर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. एससी, एसटी महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
संबंधित बातम्या
