राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांना केंद्र सरकारकडू PM मोदींसारखी सुरक्षा मिळणार-mohan bhagwat will get advanced level security from z puls modi shah will also get similar security ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांना केंद्र सरकारकडू PM मोदींसारखी सुरक्षा मिळणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांना केंद्र सरकारकडू PM मोदींसारखी सुरक्षा मिळणार

Aug 28, 2024 11:05 AM IST

Mohan Bhagwat : केंद्र सरकारने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पावर यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे प्रमुख मोहम भागवत यांना देखील याच दर्जाची सुरक्षा देण्यात आली आली आहे.

शरद पवार यांच्यानंतर आता मोहन भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा!
शरद पवार यांच्यानंतर आता मोहन भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा!

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. शरद पवार यांच्यानंतर आता त्यांना झेड पल्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांची सुरक्षा व्यवस्था आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याप्रमाणेच केली जाणार आहे. या संदर्भात नुकतेच गृह मंत्रालयाकडून परिपत्रक काढण्यात आले. ज्यामध्ये असे आढळून आले की, ज्या राज्यात भाजपची सतत नाही त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने गृह मंत्रालयाच्या हवाल्याने आपल्या एका वृत्तात हे म्हंटले आहे. भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेत सीआयएसएफच्या प्रतिनियुक्तीवर अधिकारी आणि अंग रक्षकांचा समावेश होता. तर दिल्लीतील गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना कट्टर इस्लामी संघटनांकडून धोका आहे. त्यांना मारण्याच्या धमक्या देखील वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनंतर, गृह मंत्रालयाने मोहन भागवत यांना "एएसएल संरक्षित व्यक्ती" म्हणून घोषित केले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या बाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे.

एएसएल सुरक्षेअंतर्गत, संबंधित व्यक्तीच्या संरक्षणाशी जबाबदारीत संबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य आणि इतर विभाग यासारख्या स्थानिक संस्थांचा सहभाग अनिवार्य असतो. त्यात बहुस्तरीय सुरक्षा प्रणालीचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. हेलिकॉप्टर प्रवासाची परवानगी केवळ खास रचना असलेल्या हेलिकॉप्टरमधूनच दिली जाते.

शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा

मोहन भागवत यांना झेड पल्स दर्जाची सुरक्षा देण्याआधी केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना झेड पल्स दर्जाची सुरक्षा दिली आहे. केंद्र सरकारने शरद पवारांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याची घोषणा केली होती. शरद पवारांना जेड प्लस दर्जाची केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची VIP सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वातील एनसीपीने ८ जागा जिंकल्या होत्या.

विभाग