मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nobel Peace Award ऑल्ट न्यूजचे प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांना नोबेल शांतता पुरस्कार? नामांकनाच्या यादीत नाव

Nobel Peace Award ऑल्ट न्यूजचे प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांना नोबेल शांतता पुरस्कार? नामांकनाच्या यादीत नाव

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 05, 2022 05:20 PM IST

Nobel Peace Award 2022: ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांची नावे ही नोबेल शांतता पुरस्काराच्या यादीत आहेत. या संदर्भात टाईम्सने या संदर्भात वृत्त दिले आहे. जुबैर आणि प्रतीकहे ऑल्ट न्यूज नामक वेबसाइट चालवतात जे समजमाध्यमांवर पसरवण्यात येणाऱ्या फेक न्यूज संदर्भात फैक्ट चेक करते. यावर्षी नोबल शांती पुरस्काराच्या यादीत तब्बल ३४३ उमेदवारांचा समावेश आहे.

मोहम्मद जुबेर- प्रतीक सिन्हा
मोहम्मद जुबेर- प्रतीक सिन्हा

Nobel Peace Award 2022: ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांची नावे नोबल शांतता पुरस्काराच्या यादीत असून त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळणार का याडे सर्वांचे लक्ष आहे. या संदर्भात टाईम्सने वृत्त दिली आहे. रायटर्सच्या सर्वेक्षणात जुबैर आणि प्रतीक यांची नावे ही प्रामुख्याने पुढे असल्याचे सांगण्यात आले आहेत. यावर्षीच्या नोबल शांतता पुरस्काराचे नामांकन हे शुक्रवारी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे दिला जाणार आहे.

मोहम्मद जुबैर आणि प्रतीक सिन्हा ऑल्ट न्यूजनावाचे संकेतस्थळ चालवतात. यात समाज माध्यमांवर पसरवण्यातयेणाऱ्या फेक न्यूजचे फॅक्ट चेक करण्यात येते. टाइम मॅगझीनने दीलल्या वृत्तानुसार फैक्ट चेक वेबसाइट ऑल्टन्यूजचे को-फाउडंर्स, प्रतीक आणि जुबैर यांच्या नामांकणाच्या आधारावर हा पुरस्कार जिंकू शकतात. त्यांनी नॉर्वेतील खासदार सार्वजनिक केलेल्या नामांकनांवर, बुकमेकर्सचे अंदाज आणि पीव रिसर्च इन्स्टिट्यूटच्या निवडींवर आधारित पुरस्कार जिंकण्याच्या दावेदारांपैकी एक आहेत.

नोबल शांती पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीत तब्बल ३४३ उमेदवार

यावर्षीच्या नोबल शांती पुरस्कार मानांकन यादीत तब्बल ३४३ जणांची नावे ही स्पर्धेत आहेत. ज्यात २५१ व्यक्ति आणि ९२ सामाजिक संघटना आहेत. नोबेल कमेटी नॉमिनेटेडने अजून कुणाची नावे जाहीर केलेले नाहीत. तसेच या उमेदवारांची नावे आणि माहिती ही माध्यमांना दिली जात नाहीत. रॉयटर्सने केलेय सर्वेक्षणात बेलारूसचे अपक्ष नेता स्वियातलाना सिखानौस्काया, ब्रॉडकास्टर डेविड एटनबरो, क्लाइमेट एक्टिविस्ट ग्रेटा थनबर्ग, पोप फ्रांसिस, तुवालुचे परराष्ट्र मंत्री साइमन कोफे आणि म्यांमारची राष्ट्रीय एकता सरकार यांची नावे नार्वेच्या खासदारांनद्वारे यादीत आहेत.

दिल्ली पोलिसांनी केली होती जुबेरला अटक

यावर्षी जून महीन्यात मोहम्मद जुबैर यांना २०१८मध्ये करण्यात आलेल्या एका ट्विट संदर्भात दिल्ली पोलिसांनी केली होती. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर धर्मावर आधारित विविध समूहात वैर निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणी एक सोशल मीडिया यूजर्सने एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यांच्या अटके नंतर तब्बल महिनाभर कारागृहात राहिल्यावर सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या