मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘मोदी काही करणार नाहीत मात्र श्रेय घेण्यासाठी येतील’, भाजप नेत्याचा घरचा आहेर

‘मोदी काही करणार नाहीत मात्र श्रेय घेण्यासाठी येतील’, भाजप नेत्याचा घरचा आहेर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 23, 2024 07:27 PM IST

Narendra Modi : ज्ञानवापी मशीद आणि कृष्ण जन्मभूमी मथुरा मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेणार आहे. मोदी काही करणार नाहीत, मात्र श्रेय घेण्यासाठी पुढे येतील.

Narendra Modi
Narendra Modi

Subramanian Swamy Taunt PM Modi : भाजपचे वरिष्ठ नेते आणी माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर स्वामी यांनी टीका केली आहे.

वरिष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्स (ट्विट) वर मंगळवारी (२३ जानेवारी, २०२४) लिहिले की, मी आता ज्ञानवापी मआणि कृष्ण जन्मभूमी मथुरा मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेणार आहे. मोदी काही करणार नाहीत, मात्र श्रेय घेण्यासाठी पुढे येतील.

एका अन्य ट्विटमध्ये स्वामी यांनी लिहिले होते की, मोदी प्राण प्रतिष्ठा पूजेत सामील होत आहेत. मात्र त्यांचे जीवन रामप्रमाणे आदर्श नाही. त्यांनी न आपल्या खासगी जीवनात विशेष करून आपल्या पत्नीसोबतच्या व्यवहारात भगवान रामाचे अनुकरण केले तसेच न त्यांनी पंतप्रधानांच्या रुपात राम राज्यानुसार काम केले.

स्वामी यांनी म्हटले की, आता अयोध्येतील राम मंदिर उभारले गेले आहे. एक स्वप्न सत्यात उतरले आहे. मोदींना आता रामसेतूला राष्ट्रीय वारसा रुपात मान्यता देण्यासाठी सांस्कृतिक मंत्री प्रह्लाद पटेल द्वारा पाठवलेल्या ६ वर्षापासून प्रलंबित फाइलवर स्वाक्षरी करायला हवी.

दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आणि मंत्र्यांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचे निमंत्रण पाठवले होते. मात्र राममंदिर आंदोलनात भाग घेतलेल्या स्वामी यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. 

WhatsApp channel