Modi In USA : “…तेव्हा ‘व्हाईट हाऊस’ बाहेरून बघितलं होतं” बायडेन यांच्यासमोरच मोदींनी सांगितली ३० वर्षांपूर्वीची आठवण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Modi In USA : “…तेव्हा ‘व्हाईट हाऊस’ बाहेरून बघितलं होतं” बायडेन यांच्यासमोरच मोदींनी सांगितली ३० वर्षांपूर्वीची आठवण

Modi In USA : “…तेव्हा ‘व्हाईट हाऊस’ बाहेरून बघितलं होतं” बायडेन यांच्यासमोरच मोदींनी सांगितली ३० वर्षांपूर्वीची आठवण

Updated Jun 22, 2023 11:17 PM IST

PM Modi America Visit : व्हाईट हाऊस येथेकेलेल्या भाषणातनरेंद्र मोदी म्हणाले,आज व्हाइट हाऊसमध्येमाझेशानदार स्वागत झाले. हा १४० देशवासीयांचा सन्मान आणि गौरव आहे.

PM Modi America Visit
PM Modi America Visit

PM Modi US Visit: अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरुवारी यूएस राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीव्हाइट हाउसमध्ये भव्य स्वागत किया। वॉशिंगटन मध्ये रिमझिम पाऊस सुरू असतानाही अनिवासी भारतीय व्हाइट हाउसच्या साउथ लॉनमध्ये जमले व त्यांनी पीएम मोदीच्या समर्थनार्थ नारेबाजी केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या जवळपास ३० वर्षापूर्वीच्या अमेरिकी दौऱ्याची आठवण काढली. १९९४ मध्ये मोदी पहिल्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी व्हाइट हाउसच्या बाहेर उभे राहून फोटो काढून घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो सोशल मीडियावर अनेक वर्षापासून व्हायरल होत आहे.

व्हाईट हाऊस येथेकेलेल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले, आज व्हाइट हाऊसमध्ये माझे शानदार स्वागत झाले. हा १४० देशवासीयांचा सन्मान आणि गौरव आहे. हा सन्मान अमेरिकेत राहणाऱ्या चार लाखाहून अधिक भारतीय वंशाच्या नागरिकांचा आहे. या सन्मानासाठी जो बायडेन यांचं मनपूर्वक आभार मानतो.

 

पहिल्यांदा कधी गेले होते मोदी अमेरिका दौऱ्यावर?
 

सन २०१४ मध्ये केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी आपल्या  फेसबुक अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले होते. त्यामध्ये एका फोटोत मोदी व्हाइट हाउसच्या बाहेर उभे असल्याचे दिसत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, सन १९९४ मध्ये नरेंद्र मोदींनी ACYPL (अमेरिकन काउंसिल ऑफ यंग पॉलिटिकल लीडर्स) च्या निमंत्रणावरून अमेरिकेचा दौरा केला होता. त्यांनी म्हटले आहे की, मी माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यासोबत टीमसोबत होते. आज ते भारताचे पंतप्रधान होऊन पुन्हा अमेरिकेचा दौरा करत आहेत. 

यावेळी नरेंद्र मोदींनी ३० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख केला.पंतप्रधान मोदी म्हणाले, तीन दशकांपूर्वी एक सामान्य नागरिक म्हणून मी अमेरिका दौऱ्यावर आलो होतो. तेव्हा मी व्हाईट हाऊसला बाहेरून बघितलं होतं. पंतप्रधान बनल्यानंतरही मी अनेकदा येथे आलो आहे. पण एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय-अमेरिकन समुदायासाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे आज पहिल्यांदा उघडले आहेत. अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे नागरिक आपलं कौशल्य, कर्म आणि निष्ठेनं भारताची प्रतिष्ठा वाढवत आहेत. तुम्ही सर्वजण भारत-अमेरिकेच्या संबंधातील खरी ताकद आहात. आज तुम्हाला दिलेल्या सन्मानासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना धन्यवाद देतो.

We The Peopleचा मोदींचा नारा -

मोदी म्हणाले की,भारत आणि अमेरिका दोन्ही देशातले समाज हे लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत. दोन्ही देशांच्या घटना आणि त्यांचे तीन शब्द We the People असे आहेत. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना त्यांच्या विविधतेचा अभिमान आहे. आम्ही सर्वजन हिताय,सर्वजनसुखाय या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहोत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर