Modi in Wayanad: पंतप्रधान मोदींची वायनाडला भेट, १९७९ च्या मोरबी दुर्घटनेच्या आठवणींना दिला उजाळा-modi in wayanad pm recalls 1979 morbi disaster as he vows centres full support ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Modi in Wayanad: पंतप्रधान मोदींची वायनाडला भेट, १९७९ च्या मोरबी दुर्घटनेच्या आठवणींना दिला उजाळा

Modi in Wayanad: पंतप्रधान मोदींची वायनाडला भेट, १९७९ च्या मोरबी दुर्घटनेच्या आठवणींना दिला उजाळा

Aug 10, 2024 07:46 PM IST

PM Modi in Wayanad : पंतप्रधान मोदींनी केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलन झालेल्या ठिकाणी आज भेट दिली. त्यांनी चुरलमला येथे जाऊन आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे चुरलमला परिसरात झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला.

वायनाडमधील भूस्सखलन भागांना भेट देताना नरेंद्र मोदी  (ANI Photo)
वायनाडमधील भूस्सखलन भागांना भेट देताना नरेंद्र मोदी (ANI Photo) (DPR)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागांना भेट देऊन सहानुभूती व्यक्त केली आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी गुजरातमधील १९७९ च्या मोरबी धरण दुर्घटनेच्या दु:खद आठवणींना उजाळा दिला.

पंतप्रधान वायनाडच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर होते, जिथे त्यांनी ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीची हवाई आणि प्रत्यक्ष पाहणी केली, ज्यात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरेच जण बेपत्ता आहेत.

या पाहणी दौऱ्यानंतर आढावा बैठकीत बोलताना मोदींनी भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर आपत्तीपैकी एक असलेल्या मोरबी दुर्घटनेचा अनुभव सांगितला.

मोदी म्हणाले की, मी आपत्ती जवळून पाहिली आणि अनुभवली आहे. सुमारे ४५-४७ वर्षांपूर्वी गुजरातमधील मोरबी येथे धरण होते. मुसळधार पाऊस झाला आणि धरण पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने मोरबी शहरात पाणी साचले. संपूर्ण शहरात १० ते १२ फूट पाणी होते आणि २५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, असे मोदी म्हणाले.

"मी स्वयंसेवक म्हणून जवळपास सहा महिने तिथे राहिलो... मी ही परिस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि मी तुम्हाला खात्री देतो की देश आणि भारत सरकार कोणतीही कसर सोडणार नाही.

मोदींनी घेतला नुकसानीचा आढावा -

या दौऱ्यात मोदींनी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या चूरलमाला भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि बचाव कर्मचारी, राज्याचे अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. भूस्खलनात कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मुलांसह बचावलेल्या मुलांसोबत वेळ घालवत त्यांनी मेपडी येथील मदत शिबिरालाही भेट दिली. या भेटीतील दृश्यांमध्ये मोदी पीडितांना सांत्वन करताना, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचे क्लेशदायक अनुभव सांगताना दिसत आहेत.

यावेळी त्यांच्यासोबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी उपस्थित होते. या दुर्घटनेनंतर चोरलमळा येथे लष्कराने बांधलेल्या १९० फूट उंचीच्या बेली पुलावरून ते दोघे एकत्र चालत गेले.

मोदींच्या दौऱ्यात हवाई पाहणीचाही समावेश होता, जिथे त्यांनी इरुवाझिंजी पुझा (नदी) आणि पंचिरीमट्टम, मुंडक्कई आणि चूरलमाला सह काही सर्वाधिक प्रभावित भागांची पाहणी केली.

मोदी वायनाडहून रवाना होताच त्यांनी केरळ राज्याला आश्वासन दिले की, पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व संसाधने प्रदान करेल.