Modi Gets Written Support From Nitish Kumar, Chandrababu Naidu: दिल्लीत एनडीएच्या नेत्यांनी मंजूर केलेल्या प्रस्तावात जेडीयूचे नितीशकुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांच्यासह एनडीएच्या नेत्यांनी एकमताने नरेंद्र मोदी यांची आपला नेता म्हणून निवड केली. एएनआय वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी एनडीएच्या खासदारांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर एनडीएचे मित्रपक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे मित्रपक्षांसोबत मिळून सरकार स्थापनेबाबत चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन आपल्या मंत्रिमंडळासह आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला आहे आणि नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळ नवीन सरकार सत्तेवर येईपर्यंत कार्यरत राहण्याची विनंती केली आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत निकालानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ५४३ पैकी २४० जागा जिंकल्या. परंतु, बहुमतासाठी २७२ जागांची आवश्यकता आहे. सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या होत्या. तर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी ३०३ जागांवर विजय मिळवला होता.
या निवडणुकीत विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाने ९९ जागा जिंकल्या, ज्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त आहेत. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसचा मित्रपक्षांपैकी एक समाजवादी पक्षाने यंदा उत्तर प्रदेशात ३७ जागा जिंकल्या. पश्चिम बंगाल राज्यात अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसने २९ आणि दक्षिण तामिळनाडू राज्यात द्रविड मुनेत्र कळघमने २२ जागा जिंकल्या. इंडिया आघाडीने एकूण २३२ जागा जिंकल्या आहेत. यूपीए सरकारच्या यशात राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रेचा सिंहाचा वाटा आहे, मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
संबंधित बातम्या