Modi 3.0 Cabinet: मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ कोटी लोकांना लाभ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Modi 3.0 Cabinet: मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ कोटी लोकांना लाभ

Modi 3.0 Cabinet: मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ कोटी लोकांना लाभ

Jun 10, 2024 08:17 PM IST

PM Awas Yojana : एनडीए सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीतकेंद्रीय मंत्रमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकारी मदतीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३ कोटी घरे बांधली जातील (HT PHOTO)
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३ कोटी घरे बांधली जातील (HT PHOTO)

Narendra Modi Cabinet Meeting : एनडीए सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत केंद्रीय मंत्रमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं पीएम आवास योजनेतंर्गत ३ कोटी घर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेंतर्गतजी नवी घरे बांधली जातील त्यात एलपीजी कनेक्शन, वीज कनेक्शन, नळ कनेक्शनही असतील. ७ लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे.

राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेतल्यानंतर नवनियुक्त मंत्री सायंकाळी पाचच्या सुमारास पंतप्रधान निवासस्थानी पोहोचले आणि बैठकीला उपस्थित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीनंतर खातेवाटप जाहीर केले.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र कुटुंबांची संख्या वाढल्याने निर्माण झालेल्या घरांच्या गरजा भागविण्यासाठी आणखी तीन कोटी घरे बांधली जाणार आहेत. ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना हक्काचे घर देण्यासाठी ही योजना यापुढेही सुरू ठेवली जाईल.

पात्र ग्रामीण व शहरी कुटुंबांना मूलभूत सोयीसुविधांसह घरे बांधण्यासाठी मदत देण्यासाठी केंद्र सरकार २०१५-१६ पासून पीएमएवाय योजना राबवित आहे. पीएमएवाय अंतर्गत गेल्या १० वर्षांत गृहनिर्माण योजनेंतर्गत पात्र गरीब कुटुंबांसाठी एकूण ४.२१ कोटी घरे पूर्ण करण्यात आली आहेत.

नवनियुक्त मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किसान सन्मान निधीच्या १७ व्या हफ्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह सर्व नवनियुक्त कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. या बैठकीत पीएम आवास योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. देशात ३ कोटी घरे बांधली जातील ती शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना दिली जातील.

पीएमएवाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या सर्व घरांना केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर योजनांच्या समन्वयातून घरगुती शौचालये, एलपीजी कनेक्शन, वीज जोडणी आणि कार्यक्षम घरगुती नळ जोडणी यासारख्या मूलभूत सुविधा पुरविल्या जातात.

मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांच्यासह १९ जण मोदींच्या आधीच्या मंत्रिमंडळातील आहेत.

काही नव्या चेहऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा समावेश आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर