गोहत्या करताना मुस्लिम तरुणाचे मॉब लिंचिंग, मृत्यूनंतर परिसरात तणावाची परिस्थिती, पोलीस बंदोबस्त तैनात
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गोहत्या करताना मुस्लिम तरुणाचे मॉब लिंचिंग, मृत्यूनंतर परिसरात तणावाची परिस्थिती, पोलीस बंदोबस्त तैनात

गोहत्या करताना मुस्लिम तरुणाचे मॉब लिंचिंग, मृत्यूनंतर परिसरात तणावाची परिस्थिती, पोलीस बंदोबस्त तैनात

Dec 31, 2024 04:01 PM IST

Mob Lynching : पश्चिम उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील हिंदूबहुल मंडी समिती परिसरात गायीची कत्तल केल्याच्या संशयावरून एका मुस्लिम तरुणाची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

मुरादाबादमध्ये मॉब लिंचिंग
मुरादाबादमध्ये मॉब लिंचिंग

Mob Lynching in Moradabad : पश्चिम उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील हिंदूबहुल मंडी समिती परिसरात गायीची कत्तल केल्याच्या संशयावरून एका मुस्लिम तरुणाची बेदम मारहाण करत हत्या (Mob Lynching) करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून मंगळवारी सकाळी तरुणाच्या मृतदेहावर त्याच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले. तसेच अनेक मुस्लीमबहुल भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मुरादाबादचे विभागीय आयुक्त औंजनेय कुमार सिंह यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि कोणताही त्रास होऊ नये म्हणून आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार रणविजय सिंह यांनी सांगितले की, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मंडी समितीच्या आवारातून काही लोकांनी शाहिदीन (२९, रा. असलतपुरा) याला पकडले होते. तो तीन जणांसह गायीची कत्तल करत होता, असा आरोप आहे. गोहत्येमुळे संतप्त झालेल्या जमावाने पकडलेल्या तरुणाला काठी आणि रॉडने बेदम मारहाण केली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. मुरादाबाद जिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. रात्री शवविच्छेदन करण्यात आले आणि सकाळी कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

एएसपीने दिलेल्या माहितीनुसार, शाहिदीनचा भाऊ गुड्डूच्या फिर्यादीवरून माझोला पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी, घटनास्थळावरून पळून गेलेल्या मृत व्यक्तीसह अन्य तिघांविरोधात गोहत्येच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून त्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून तेथून एका गायीचा मृतदेहही सापडला आहे.

हात जोडून जीवाची भीक मागताना व्हिडिओ व्हायरल -

ही घटना सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माझोला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंडी समितीत घडली. मंडी समितीच्या आवारात काही जण गायींची कत्तल करत असल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना मिळाली. हे लक्षात येताच स्थानिक लोकांची गर्दी जमली. गायीची कत्तल करणारे चार जण पळून गेले, पण शाहेदीनला जमावाने पकडले. त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा तो जीवाच्या आकांताना हात जोडत राहिला. पण संतप्त जमावाने त्याचे ऐकले नाही. त्याला इतकी मारहाण झाली की तो मरणासन्न झाला. त्यानंतर २१ तासांनी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

बॉडी बिल्डर होता शाहेदीन -

असलतपुरा येथील रहिवासी शाहिदीन हा बॉडीबिल्डर होता. त्याने अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. या दरम्यान त्याला सप्लिमेंट घेण्याचे व्यसन लागले. या व्यसनामुळे तो आजारी पडला. स्वस्त आणि चुकीचे सप्लिमेंट घेतल्याने मी आजारी पडू लागला. गेल्या दोन वर्षांपासून त्याला कोणताही कामधंदा नव्हता.  पूर्वी तो एका कारखान्यात कामाला होता. पण आजारी पडल्यानंतर त्याला नोकरी गमवावी लागली. अशा तऱ्हेने तो गोतस्करांच्या तावडीत सापडला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर