Mizoram Plane Crash: मिझोरममधील लेंगपूई एअरपोर्ट (Lengpui Airport) वर मंगळवारी सकाळी मोठा अपघात झाला. म्यानमार लष्कराचे एक विमान (Myanmar Military Plane) रन वे वरून घसरले. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत.
विमानात वैमानिकासोबत १४ लोक प्रवास करत होते. जखमींना लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान भारतातून आपले सैनिक परत नेण्यासाठी आले आहे.
सांगितले जात आहे की, लेंगपुईमधील टेबल टॉप रनवे या दुर्घटनेला कारणीभूत आहे. कारण हा रेनवे देशातील सर्वात धोकादायक लँडिंग भागापैकी एक आहे. सैनिकांनी म्यानमार वायु सेनेच्या विमानातून लेंगपुई विमानतळावरून सितवेपर्यंत पाठवले. अन्य ९२ सैनिकांना आज परत पाठवले जाणार होते.
भारताने सोमवारी १८४ म्यानमार सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठवले होते. हे सैनिक मागच्या आठवड्यात एका जात समूहावर केलेल्या गोळीबारानंतर आपल्या देशातून पळून मिझोरममध्ये आले आहे. आसाम रायफल्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मागच्या आठवड्यात एकूण २७६ म्यानमारचे सैनिक मिझोरममध्ये आले होते.
संबंधित बातम्या