मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Aditya L1 : भारताच्या सूर्य मोहिमेचं पहिलं यश; आदित्य यान निश्चित स्थळी पोहोचलं!

Aditya L1 : भारताच्या सूर्य मोहिमेचं पहिलं यश; आदित्य यान निश्चित स्थळी पोहोचलं!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 06, 2024 05:39 PM IST

Aditya L 1 : इस्रोनं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. सूर्य मोहिमेवर गेलेला उपग्रह आदित्य एल-1 आपल्या निश्चित स्थळी पोहोचला आहे.

Aditya L 1
Aditya L 1

ISRO Mission Surya : चांद्रयान २ मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) आणखी एक इतिहास रचला आहे. इस्रोच्या 'मिशन सूर्य' मोहिमेचा भाग म्हणून प्रक्षेपित करण्यात आलेला उपग्रह आदित्य एल-1 त्याच्या निश्चित स्थळी पोहोचला आहे. आदित्य एल-१ ला लॅन्ग्रेस पॉइंटच्या हॅलो ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या स्थिर करण्यात आलं आहे.

आदित्य L1 उपग्रह गेल्या वर्षी २ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आला होता. हा उपग्रह सूर्य-पृथ्वीच्या एकूण अंतराच्या मध्यावरील 'लॅग्रेंज पॉइंट 1' (L1) वर स्थिर करण्यात आला आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. 

लक्षद्वीपला जाऊन फोटो काढतात, हे महापुरुष मणिपूरला का जात नाहीत? मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींवर हल्लाबोल

आदित्य L-1 शनिवारी दुपारी ४ वाजता एल वन बिंदूवर पोहोचेल, असं इस्रोनं आधीच सांगितलं होतं. त्यानुसार ते पोहोचलं आहे. त्यानंतर ते निश्चित कक्षेत स्थिर करण्यात आलं आहे. हे ठिकाण पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूर आहे आणि या ठिकाणापासून सूर्याचं अंतर देखील १५ लाख किलोमीटर आहे. 

पंतप्रधानांनी केलं इस्रोचं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया साइट X वरून इस्रोचं व भारतीय संशोधकांचं अभिनंदन केलं आहे. 'भारतानं आणखी एक यश मिळवलं आहे. भारतातील पहिली सौर वेधशाळा आदित्य-L1 आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचली आहे. सर्वात किचकट आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा पूर्ण करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ किती समर्पित काम करताता याचा हा पुरावा आहे. मानवतेच्या हितासाठी विज्ञानाच्या कक्षा अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न सुरूच राहील, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray : आत्ताचं सरकार म्हणजे ‘सहारा चळवळ’, राज ठाकरेंची महायुती सरकारवर टीका

काय आहे सूर्य मिशनचा उद्देश?

सौर वातावरणातील बदल, सूर्याच्या प्रभामंडळातील उष्णता, सूर्याच्या पृष्ठभागावरील सौर भूकंप, सूर्याच्या ज्वाळा व त्यासंबंधीच्या हालचाली आणि पृथ्वीच्या जवळच्या अवकाशातील हवामानातील अडचणींचा अभ्यास करणं हा मिशन सूर्यचा उद्देश आहे.

WhatsApp channel