खाऊचं आमिष दाखवून ८ वर्षीय मुलीवर बलात्कार, रडू लागल्यावर दिली २० रुपयांची नोट अन् तिथंच फसला..
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खाऊचं आमिष दाखवून ८ वर्षीय मुलीवर बलात्कार, रडू लागल्यावर दिली २० रुपयांची नोट अन् तिथंच फसला..

खाऊचं आमिष दाखवून ८ वर्षीय मुलीवर बलात्कार, रडू लागल्यावर दिली २० रुपयांची नोट अन् तिथंच फसला..

Updated Aug 12, 2024 06:05 PM IST

Crime News : फेरीवाल्याने चिमुकलीला मिठाईचे आमिष दाखवले होते. त्याचबरोबर तो तिला घेऊन आपल्या घरी गेला व तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी रडू लागल्यावर तिच्या हातात २० रुपये दिले.

खाऊचं आमिष दाखवून ८ वर्षीय मुलीवर बलात्कार (प्रतिकात्मक छायाचित्र)
खाऊचं आमिष दाखवून ८ वर्षीय मुलीवर बलात्कार (प्रतिकात्मक छायाचित्र)

मध्य प्रदेश राज्यातील भिंड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आठ वर्षाच्या मुलीवर (Minor girl physical abused) बलात्कार करून तिच्या हातात २० रुपये ठेवले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी एकफेरीवाला आहे. त्याने मुलीला खाऊचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले व तेथे चिमुकलीवर अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवार रात्री भिंड येथील गोहद परिसरात झाली.

बलात्कार करून हातात दिले २० रुपये -
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीनुसार फेरीवाल्याने चिमुकलीला मिठाईचे आमिष दाखवले होते. त्याचबरोबर तो तिला घेऊन आपल्या घरी गेला व तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी रडू लागल्यावर तिच्या हातात २० रुपये दिले. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या हातात २० रुपये पाहून आईने चौकशी केली आणि मुलीने तिला घडलेला प्रसंग सांगितला. मुलीच्या हातात पैसे पाहून आईला प्रश्न पडला वमुलीने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. ही घटना ऐकून तिच्या आईला धक्का बसला. यानंतर मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठूनआरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोप हा स्थानिक फेरीवाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी फेरीवाल्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम (पॉक्सो) च्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नवी मुंबईत शेजारच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार –

वाशी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. शेजारच्या १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवाात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाशी येथील कोपरी गावातील एका इमारतीत वास्तव्यास आहे.

आरोपी देखील त्याच इमारतीत राहतो. काही दिवसांपूर्वी पीडिताच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी तिला दवाखान्यात नेले. मात्र, वैद्यकीय अहवालात पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. याप्रकरणी पीडिताच्या पालकांनी तिच्याकडे विचारपूस केले असता तिने संपूर्ण प्रकार सांगितला. आरोपीने २०२० पासून अनेक वेळा पीडितावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडिताच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देताच आरोपीला अटक करण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर