खळबळजनक! १३ वर्षांची मुलगी गर्भवती, सरकारी शाळेतील शिपायाने केला बलात्कार-minor girl becomes pregnant after rape farrukhabad case is related to government school ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खळबळजनक! १३ वर्षांची मुलगी गर्भवती, सरकारी शाळेतील शिपायाने केला बलात्कार

खळबळजनक! १३ वर्षांची मुलगी गर्भवती, सरकारी शाळेतील शिपायाने केला बलात्कार

Sep 01, 2024 08:16 PM IST

Minor Girl rape : सरकारी शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्यानंतर १३ वर्षीय मुलगी गर्भवती झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील आहे.

१३ वर्षांची मुलगी गर्भवती
१३ वर्षांची मुलगी गर्भवती

उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबाद जिल्ह्यात सरकारी शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्यानंतर १३ वर्षीय मुलगी गर्भवती झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, शाळेतील शिपाई व त्यांच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याच्या साथीदाराने घटनेच्या वेळी त्याला मदत केल्याचा आरोप आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, १३ वर्षीय पीडितेच्या कुटूंबाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडिता रात्रीच्या वेळी शौचास गेली होती. तेव्हा गावातील पंकज आणि अमितने तिला पकडले व रिकाम्या घरात घेऊन गेले. अमितने तिच्यावर अत्याचार केला तर पंकज बाहेर उभा होता.

 सांगितले जात आहे की, सरकारी शाळेतील शिपायाने पाच महिन्याच्या आधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सरकारी शाळेचा शिपाई व त्याला या प्रकरणात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी अमितने पीडितेने आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडात कापडाचा बोळा भरून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर याची वाच्याता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर जेव्हा मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिली तेव्हा तिच्या आईला याप्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल -

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित हा सरकारी शाळेत शिपाई आहे. अनुकंपा तत्वावर त्याला नोकरी मिळाली आहे. कायमगंज कोतवालीचे अधिकारी राम अवतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

साखरपुड्यानंतर फिरायला नेऊन तरुणीवर भावी पतीनं केला बलात्कार –

मुलीचा साखरपुडा झाला. ती होणाऱ्या नवऱ्यासोबत ऋषिकेश येथे  फिरायला गेली असता, त्याने हॉटेल रूममध्ये तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तिच्या अंगावर आठ ठिकाणी चावला व तिला गंभीर मारहाण केली. यानंतर त्याने त्यांच्या मित्रांना देखील फोन करून बोलावून घेतलं. त्याच्या मित्रांनीही तरुणीवर अत्याचार  केला. या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.  पतीनंतर त्याच्या मित्रांना देखील बोलावून तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर पीडिता जेव्हा तिच्या घरी आली तेव्हा तिने तिच्या आईला घडला प्रकार सांगितला. ज्यानंतर आईने पोलिसात धाव घेतली.