Viral News : पाकिस्तानची टिकटॉक स्टार मिनाहिल मलिकचा प्राइवेट व्हिडिओ सोशल मिडियावर झाला वायरल; नेटकरी म्हणाले…
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : पाकिस्तानची टिकटॉक स्टार मिनाहिल मलिकचा प्राइवेट व्हिडिओ सोशल मिडियावर झाला वायरल; नेटकरी म्हणाले…

Viral News : पाकिस्तानची टिकटॉक स्टार मिनाहिल मलिकचा प्राइवेट व्हिडिओ सोशल मिडियावर झाला वायरल; नेटकरी म्हणाले…

Published Oct 24, 2024 04:21 PM IST

Minahil Malik Video : पाकिस्तानची टिकटॉकस्टार मिनाहिल हिचा एका तरुणासोबतचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती इंटिमेट झाल्याचं दिसत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर तिला ट्रोल केले आहे.

पाकिस्तानची टिकटॉक स्टार मिनाहिल मलिकचा प्राइवेट व्हिडिओ सोशल मिडियावर झाला वायरल; नेटकरी म्हणाले…
पाकिस्तानची टिकटॉक स्टार मिनाहिल मलिकचा प्राइवेट व्हिडिओ सोशल मिडियावर झाला वायरल; नेटकरी म्हणाले…

Minahil Malik viral MMS : पाकिस्तानी टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. खरं तर तिचा एक प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मिनाहिल ही आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. तिच्या या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. पाकिस्तानपासून भारतापर्यंत सर्वत्र मिनाहिलच्या या व्हायरल व्हिडिओची चर्चा होत आहे. मात्र, मिनाहिलने हा व्हिडिओ खोटा, एडिट व मॉर्फ केला असल्याचं म्हटलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मिनाहिल एका मुलासोबत इंटिमेट होत असल्याचं दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर युजर्सनी केला आहे. दोघेही एकाच खोलीत आक्षेपार्ह स्थितीत आहेत. हा एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी व्हिडिओचे स्क्रीन शॉट काढून देखील शेअर केले आहे. हे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया स्टार मिनाहिलचे असे व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे व तिच्या सारख्या काही स्टार्सचे एमएमएस व्हायरल झाले आहेत. मिनाहिलचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकजण दु:ख व्यक्त करत आहेत, तर काही युजर्स याला तिचा पब्लिसिटी स्टंट देखील म्हणत आहेत.

व्हायरल व्हिडिओवर काय म्हणाली मिनाहिल ?

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिनाहिल मलिकने प्रतिक्रिया दिली आहे. तिने एक निवेदन जारी करून हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे. तिच्या व्हिडिओ हा चुकीच्या पद्धतीने एडिट व मॉर्फ करण्यात आला असल्याचं तिने म्हटलं आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ तिचा नसल्याच देखील तिने म्हटलं आहे. तिने या प्रकरणी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे (एफआयए) तक्रार दाखल केली आहे आणि चाहत्यांना व्हायरल व्हिडिओची माहिती देण्याची विनंती केली आहे. टिक टॉकवर जारी करण्यात आलेल्या व्हिडिओत तिने म्हटले आहे की, "हा व्हिडिओ पूर्णपणे फेक आहेत. मी यापूर्वीच एफआयएकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे आणि लवकरच या प्रकरणातील आरोपीला अटक केली जाईल. या व्हायरल व्हिडिओमुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असल्याचं मिनाहिलने म्हटलं आहे.

कोण आहे मिनाहिल मलिक ?  

पाकिस्तानची रहिवासी असलेली मिनाहिल मलिक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे खूप फॅन फॉलोइंग आहे. टिकटॉकवरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर १.८ मिलियन युजर्स मिनाहिल मलिकला फॉलो करतात. यामध्ये ती तिचे फोटो, रील्स, व्हिडिओ शेअर करते. तिच्या प्रत्येक पोस्टला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. याआधीही मिनाहिलचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही वर्षांपूर्वी तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आले होते.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर