मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : करोडपती बॉयफ्रेंडची कमाल! गर्लफ्रेंडचे सामान हरवल्यानं एअरलाइन्सला धडा शिकवण्यासाठी थेट वेबसाइटच केली तयार

Viral news : करोडपती बॉयफ्रेंडची कमाल! गर्लफ्रेंडचे सामान हरवल्यानं एअरलाइन्सला धडा शिकवण्यासाठी थेट वेबसाइटच केली तयार

Jul 03, 2024 12:45 PM IST

Viral news : विमानतळावर हरवलेले सामान शोधणे दिव्य काम असते. हे सामान शोधण्यासाठी प्रवाशांना अनेकदा अडचणी येतात. प्रेयसीचे सामान हरवल्याने एका कोट्यवधी बॉयफ्रेंडने चक्क वेबसाइट तयार केली असून या वेबसाईटमध्ये हरवलेल्या सामानानुसार विमान कंपन्यांना रँकिंग मिळणार आहे.

करोडपती बॉयफ्रेंडची कमाल! गर्लफ्रेंडचे सामान हरवल्यानं एअरलाइन्सला धडा शिकवण्यासाठी थेट वेबसाइटच  केली तयार
करोडपती बॉयफ्रेंडची कमाल! गर्लफ्रेंडचे सामान हरवल्यानं एअरलाइन्सला धडा शिकवण्यासाठी थेट वेबसाइटच केली तयार (HT)

Viral news : विमान प्रवासात सामान हरवल्यानंतर प्रवाशांना मोठा त्रास होतो. तर अनेकदा प्रवासात सामान तुटल्यावर किंवा हरवलेल्या बॅगाबाबत एअरलाइन्सशी व्यवहार करताना मनस्ताप होतो. पण एका करोडपती बॉयफ्रेंडनं हे मनावर घेतलं. त्याच्या प्रेसईची सुटकेस हरवल्यानंतर, त्याने या समस्येवर तोडगा काढला. त्याला विमान कंपन्यांनाही धडा शिकवायचा होता. यासाठी त्यानं थेट नवी वेबसाइटच तयार केली. या वेबसाइटमध्ये विमान कंपन्यांना सामान हरवल्यानुसार रेटिंग देता येतं. पीटर लेव्हल्स असे या कोरोडती बॉयफ्रेंडचे नाव असून तो मूळचा नेदरलँड येथील बांधकाम व्ययवसाईक आहे. त्यानं ४० हून अधिक स्टार्टअप सुरू केले आहेत. काही वर्षांपूर्वी त्याने १२ महिन्यांत १२ स्टार्टअप सुरू करून तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

त्याच्या प्रेयसीची बॅग विमान प्रवासादरम्यान, हरवली होती. मात्र, तिला विमान कंपनीचा वाईट अनुभव आल्याने त्यानं विमान कंपनीला धडा शिकवण्यासाठी थेट रॅंकिंग देण्यासाठी थेट वेबसाईट तयार केली. या वेबसाईटची माहिती त्यानं सोशल मीडियावर शेअर केली. वेबसाइटची रँकिंग सिस्टम फ्लाइट्सची संख्या आणि अशा इतर बाबी लक्षात घेऊन वेगवेगळ्या श्रेणीनुसार एअरलाइन्सचे वर्गीकरण करते. विमान कंपन्यांमध्ये सामान हरवल्यावर ते परत कधी मिळेल याची रिअल-टाइम रँकिंग या वेबसाईटद्वारे दिली जाते.

ट्रेंडिंग न्यूज

एक आठवड्यापूर्वी लिस्बन ते बार्सिलोना या फ्लाइट दरम्यान स्पॅनिश एअरलाइन बुएलिंग एअरलाइन्समध्ये त्याच्या प्रेयसीची सुटकेस हरवली होती. मात्र, विमान कंपन्यांनी टीला चुकीची वागणूक दिली. त्यामुळे लेव्हल्सला वेबसाइट तयार करण्याची प्रेरणा मिळाली. सूटकेस सध्या ऑस्टिन विमानतळावर आहे आणि ते देखील ऑस्टिन येथे आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुटकेस त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचवण्याचे आश्वासन विमान कंपनीतर्फे दिले जात अहोते. मात्र, ते अद्याप पोहोचले नाही. बार्सिलोनामध्ये लेव्हल्स आणि त्याच्या प्रेयसीला या घटनेमुळे मोठा त्रास झाला. त्याची सुटकेस विमानतळावर होती. जेव्हा ते बार्सिलोनामध्ये होते. तेव्हा विमान कंपनीने त्याला हॉटेलमध्ये सूटकेस पोहोचवण्यासाठी संपर्क करण्याचे आश्वासन दिले पण कोणीही त्याच्याशी संपर्क साधला नाही. लेव्हल्सने या घटनेबद्दल निराशा व्यक्त केली आणि सांगितले की तो पुन्हा कधीही कतार एअरवेजच्या मालकीच्या व्ह्यूलिंगने उड्डाण करणार नाही.

प्रवाशांचे सामान हरवण्याच्या यादीत एअर इंडिया अव्वल

भारतीय विमान कंपन्यांनी क्रमवारीत सर्वात वाईट कामगिरी केली आहे. या यादीत एअर इंडिया अव्वल असून त्यानंतर एर लिंगस, वेस्टजेट एअरलाइन्स, ब्रिटिश एअरवेज, आयबेरिया आणि स्पाइसजेट यांचा क्रमांक लागतो. ही रँकिंग दर्शविते की एअर इंडियाकडे सर्वात जास्त हरवलेल्या वस्तू आहेत, तर जपानच्या ऑल निप्पॉन एअरवेजमध्ये हरवलेल्या वस्तू सर्वात कमी आहे. लॅटम ब्राझील आणि अलास्का एअरलाइन्सने सर्वात कमी प्रवाशांचे सामान हरवले आहेत. वेबसाइट प्रामुख्याने सोशल मीडियावरून माहिती गोळा करते. कारण एअरलाइन्स त्यांच्या हरवलेल्या सामानाची आकडेवारी क्वचितच प्रसिद्ध करतात. त्यामुळे ही क्रमवारी पूर्णपणे बिनचूक असेल असे नाही.

लेव्हल्सच्या पोस्टला प्रतिसाद देताना, एका एक्स यूझरने पोस्ट केली की, "या प्रियकराला नवा पुरस्कार मिळायला हवा. तर दुसऱ्या एका यूझरने लिहिले, "एअर फ्रान्सने माझी बॅग दोनदा एकाच ट्रिपमध्ये हरवली. त्यांची ही वेबसाइट प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. तसेच विमांन कंपन्यांचे मूल्यांकन होत असल्याने आपली कामगिरी सुधारण्यासाठी विमान कंपन्या प्रयत्न करत आहे.

WhatsApp channel
विभाग