मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  India-Pakistan : 'सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान भारतावर करणार होता अण्वस्त्र हल्ला'; अमेरिकेचे माजी माईक पॉम्पीओयांचे विधान
Mike Pompeo
Mike Pompeo

India-Pakistan : 'सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान भारतावर करणार होता अण्वस्त्र हल्ला'; अमेरिकेचे माजी माईक पॉम्पीओयांचे विधान

25 January 2023, 8:04 ISTNinad Vijayrao Deshmukh

Mike Pompeo On India-Pakistan: अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी भारत-पाकिस्तान संदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता असा दावा त्यांनी केला आहे.

Mike Pompeo : भारताने पाकिस्तानवर २०१९ मध्ये बलाकोट येथील दहशतवादी तळावर सर्जिकल स्ट्राईक केली होती. या नंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत होता, असा खळबळजनक दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी केला. माईक पॉम्पीओ यांनी एक पुस्तक लिहिले असून त्यात त्यांनी या बाबत खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांनी त्यांच्या 'नेव्हर गिव्ह एन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह' हे पुस्तक लिहिले आहे. यात त्यांनी याबाबत लिहिले आहे. या बाबतचे वृत्त पीटीआयने दिली आहे. भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानाच्या हद्दीत जाऊन भारतीय सैन्यानं तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलए होते. या घटनेनंतर पाकिस्तानने भारतावर अणुहल्ला करण्याची योजना आखली होती. ही माहिती त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना दिली होती. २०१९ च्या २७-२८ दरम्यान, ही घटना घडली होती. यावेळी पोम्पीओ हे अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी हनोई येथे गेले होते. यानंतर त्यांनी दोन्ही देशांसोबत या बाबत चर्चा केली होती.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारताने बालाकोट येथे पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले होते. या नंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध अण्वस्त्र हल्ल्याच्या दारापर्यन्त पोहचले होते.

माईक पॉम्पीओ यांनी या संदर्भात आणखी खुलासा करत म्हटले आहे की, ते हनोई, व्हिएतनाममध्ये असताना त्यांना या बाबत माहिती मिळाली. त्या सभेतील ती रात्र कधीही विसरणार नाहीत. त्यावेळी मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी पाकिस्तानच्या आण्विक हल्ल्याबाबत बोललो. पॉम्पीओ यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना भारताने पाकिस्तानला दिलेला संदेश सांगितला. मात्र, बाजवा हे चर्चेच्या मनस्थितीत नव्हते. आमचा असा हेतू नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट सांगितले होते. तुम्हाला मिळालेली माहिती ही चुकीची असल्याचे बाजवा यांनी सांगितले होते.

दरम्यान भारत देखील पाकिस्तानच्या या कारवाई बद्दल उत्तर देणार होता. पाकिस्तानच्या सीमेवर अण्वस्त्र तैनात करण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, मी चर्चा केल्यावर भारताने संयमाची भूमिका घेतली, असेही ते म्हणाले.

 

विभाग