जगात कोणत्या धर्माचे लोक सर्वाधिक स्थलांतरित; ख्रिश्चन पहिल्या नंबरवर, हिंदू व मुस्लिमांचा नंबर कितवा?-migration very fast in world christians on top muslims and hindus on which number ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जगात कोणत्या धर्माचे लोक सर्वाधिक स्थलांतरित; ख्रिश्चन पहिल्या नंबरवर, हिंदू व मुस्लिमांचा नंबर कितवा?

जगात कोणत्या धर्माचे लोक सर्वाधिक स्थलांतरित; ख्रिश्चन पहिल्या नंबरवर, हिंदू व मुस्लिमांचा नंबर कितवा?

Aug 22, 2024 06:04 PM IST

Migration in World : प्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, जगातील ३.६ टक्के लोकसंख्या ज्या देशात जन्माला आली त्या देशात राहत नाही. त्यांची संख्या सुमारे २८ कोटी आहे. प्यू रिसर्चच्या एका अहवालानुसार, धर्माच्या बाबतीत इतर देशांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या संख्येत ख्रिश्चन पहिल्या क्रमांकावर आहेत.

स्थलांतरितांमध्ये मोठी वाढ
स्थलांतरितांमध्ये मोठी वाढ

स्थलांतरला निसर्गाचा नियम म्हणतात. कधी उपजीविकेमुळे, तर कधी शिक्षणामुळे किंवा कुठल्याही संकटामुळे अनेकदा लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या काही शतकांमध्ये इतर देशांतील लोकही अन्य देशात स्थायिक होऊ लागले आहेत. ग्लोबल व्हिलेज या संकल्पनेतील हा एक मोठा घटक मानला जातो. प्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, जगातील ३.६ टक्के लोकसंख्या ज्या देशात जन्माला आली त्या देशात राहत नाहीत. त्यांची संख्या सुमारे २८ कोटी आहे. प्यू रिसर्चच्या एका अहवालानुसार, धर्माच्या बाबतीत इतर देशांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या संख्येत ख्रिश्चन पहिल्या क्रमांकावर आहेत.

स्थलांतरितांमध्ये ख्रिश्चन पहिल्या क्रमांकावर -

स्थलांतरित झाल्यानंतर इतर देशांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये ख्रिश्चनांचे प्रमाण ४७ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुस्लीम असून त्यांची लोकसंख्या स्थलांतर करणाऱ्यांच्या संख्येच्या २९ टक्के आहे. या बाबतीत हिंदू तिसऱ्या क्रमांकावर आहेत, पण हा फरक ख्रिश्चन आणि मुस्लिमांपेक्षा खूप मोठा आहे. ज्या देशात त्यांचा जन्म झाला त्या देशातून  ५ टक्के हिंदू स्थलांतरित झाले. यामध्ये बौद्ध चार टक्के तर ज्यू एक टक्का क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे १३ टक्के स्थलांतरित नास्तिक आहेत. ख्रिश्चन आणि इस्लामनंतर असे लोक तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

परदेशात स्थायिक होणाऱ्यांच्या संख्येत ८३ टक्क्यांची वाढ -

त्याचवेळी आणखी एक धक्कादायक आकडेवारी म्हणजे जगभरात स्थलांतर झपाट्याने वाढले आहे. आपला देश सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्यांची संख्या ८३ टक्क्यांनी वाढली आहे, तर जागतिक लोकसंख्या ४७ टक्क्यांनी वाढली आहे. स्थलांतरित झालेल्या लोकांमध्ये सर्व प्रौढ आणि लहान मुलांचा समावेश करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. यात कधीही स्थलांतरित होऊन देश सोडून गेलेल्या लोकांचा समावेश आहे. या अहवालात युद्ध, आर्थिक संकट, दुष्काळ यांसारख्या आपत्तींचाही स्थलांतरासाठी प्रमुख घटक मानण्यात आला आहे.

पलायनाची कारणे -

धार्मिक छळ हे या पलायनाचे प्रमुख कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. किंबहुना अल्पसंख्याकांमध्ये असा कल अधिक दिसून येतो. छळामुळे ते सहसा अशा देशांमध्ये राहणे पसंत करतात जिथे स्वतःच्या धर्माला मानणारे लोक बहुसंख्य आहेत. अशा स्थलांतरामुळे अनेक देशांच्या लोकसंख्येतही मोठा बदल झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.