इस्रायलचा गाझा आणि लेबनॉनमध्ये भीषण हल्ला! ५० मुलांसह डझनभर नागरिक ठार; युद्धाची तीव्रता वाढली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इस्रायलचा गाझा आणि लेबनॉनमध्ये भीषण हल्ला! ५० मुलांसह डझनभर नागरिक ठार; युद्धाची तीव्रता वाढली

इस्रायलचा गाझा आणि लेबनॉनमध्ये भीषण हल्ला! ५० मुलांसह डझनभर नागरिक ठार; युद्धाची तीव्रता वाढली

Nov 02, 2024 12:50 PM IST

israel lebanon hamas war : इस्रायलने शुक्रवारी गाझा आणि लेबनॉनमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ५० मुलांसह काही नागरिक ठार झाले लेबनॉनमध्ये इस्रायलने गेल्या काही दिवसांपासून लष्करी कारवाई वाढवली आहे.

इस्रायलचा गाझा आणि लेबनॉनमध्ये भीषण हल्ला! ५० मुलांसह डझनभर नागरिक ठार; युद्धाची तीव्रता वाढली
इस्रायलचा गाझा आणि लेबनॉनमध्ये भीषण हल्ला! ५० मुलांसह डझनभर नागरिक ठार; युद्धाची तीव्रता वाढली

israel lebanon hamas war : मध्यपूर्वेतील हमास आणि हिजबुल्लाहचा खात्मा करण्याचा निर्धार केल्यानंतर इस्रायल अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे.   शुक्रवारी गाझा आणि लेबनॉनवर इस्रायलने एकाच वेळी भीषण हवाई हल्ले केले.  दोन्ही ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये डझनभर नागरिकांचा  मृत्यू झाला आहे. इस्रायलने लेबनॉनच्या ईशान्येकडील गावांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. यात  ५२ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  

गाझाच्या उत्तर भागात लोकांच्या घरांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यात ८४ जण ठार झाले आहेत. गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझामध्ये शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ५० हून अधिक मुलांचा समावेश आहे. जबलिया शरणार्थी छावणीत झालेल्या हल्ल्यात अनेक जण ठार झाले होते.

दरम्यान, इस्रायलने लेबनॉनमधील अनेक इमारतींना लक्ष्य केले, ज्यामुळे अनेकांना देश सोडून पलायन करावे लागले. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात २०२३ मध्ये सुरू झालेल्या संघर्षानंतर लेबनॉनमध्ये आतापर्यंत २,८९७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  तर १३,१५० जण जखमी झाले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मृतांमध्ये एक चतुर्थांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यानंतर १४ लाख लोक विस्थापित झाल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे.

इस्रायलने म्हटले आहे की, हमासच्या पायाभूत सुविधा आणि नुसरत निर्वासित छावणीजवळ कार्यरत असलेल्या एका दहशतवादी गटाला  लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायलच्या लष्कराने एका वेगळ्या घोषणेत म्हटले आहे की, गाझाच्या दक्षिणेकडील खान युनूस शहरात एका वाहनावर केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या पॉलिटिकल ब्युरोचा प्रमुख नेता इझ अल-दीन कसाब आणि त्याचा उपप्रमुख अयमान आयेश ठार झाला. हमासने या नेत्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. अयमान आयेश हा हमासच्या शेवटच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता. दरम्यान, इस्रायलने हमासला शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. मात्र, हमासने इस्रायल विरोधी हल्ले सुरूच ठेवले आहेत. 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर