Microsoft Job News: चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, असे अनेकांची इच्छा असते. मात्र, चांगला पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणही अधिक असतो. परंतु, मायक्रोसॉफ्ट कंपनीत अवघे काही तास काम करून जास्त पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्याची गोष्ट ऐकून सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. लोक या नोकरीला 'ड्रीम जॉब' म्हणत आहेत.
@ronawang नावाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘माझा एक मित्र आहे, जो मायक्रोसॉफ्टमध्ये काम करतो. तो आठवड्यातून फक्त १५ ते २० तास काम करतो आणि उर्वरित वेळ क्रिकेट लीग खेळतो. यासाठी त्याला ३ लाख डॉलर म्हणजेच २ कोटींहून अधिक पगार मिळतो.’ या पोस्टला आतापर्यंत २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे आदराने पाहिले जाते. परंतु, फक्त काही तास काम करून चांगला पगार मिळवणाऱ्या व्यक्तीबाबत जाणून लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महेश नावाच्या भारतीय युजरने कमेंट केली की, ‘मायक्रोसॉफ्ट खूप आकर्षक आहे. जवळजवळ स्वप्नवत आहे! एमएसएफटीमधील माझ्या जवळजवळ सर्व मित्र कमी तास काम करून चांगला पगार मिळवतातआणि मी त्यांच्यासाठी आनंदी आहे.’ दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, मला मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळेल का? मी आठवड्यात ५० तास काम करायला तयार आहे.'
मायक्रोसॉफ्ट हे आज कॉम्प्युटर जगातील खूप प्रसिद्ध नाव आहे. संगणक क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट ही आघाडीची कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनची स्थापना बिल गेट्स आणि त्यांचे बालपणीचे मित्र पॉल ऍलन यांच्यासोबत मिळून ४ एप्रिल १९७५ रोजी केली. मायक्रोसॉफ्ट कंपनी विंडोज ऑपरेटिंग सिस्टम बनवते. बिल गेट्स यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९५५ मध्ये अमेरिका येथील वॉशिंग्टन येथे झाला. वयाच्या 13 वर्षीच बिल गेट्स यांनी आपला पहिला सॉफ्टवेअर प्रोग्रॅम तयार केला. महत्त्वाचे म्हणजे, बिल गेट्स हे कॉलेज ड्रॉपआऊट आहेत. त्यांनी १९७५ मध्ये आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठ सोडले, जे त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. फोर्जच्या रियल टाईम बिलेनियरच्या यादीनूसार बिल गेट्स यांची संपत्ती १२३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे.