लोकसभा निवडणुकीवर मार्क झुकेरबर्गने केलेल्या विधानावर भाजप आक्रमक! संसदीय समिती 'मेटा'ला बजावणार समन्स
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लोकसभा निवडणुकीवर मार्क झुकेरबर्गने केलेल्या विधानावर भाजप आक्रमक! संसदीय समिती 'मेटा'ला बजावणार समन्स

लोकसभा निवडणुकीवर मार्क झुकेरबर्गने केलेल्या विधानावर भाजप आक्रमक! संसदीय समिती 'मेटा'ला बजावणार समन्स

Jan 14, 2025 04:28 PM IST

Mark Zuckerberg on Indian Loksabha Election : मेटा कंपनीचे मालक मार्क झुकेरबर्गने लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाबाबत खोटे विधान केल्याने संसदीय समिती त्यांना समन्स बजावणार आहे. त्यांचं विधान चुकीच्या माहितीवर आधारित असल्याची टीका रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केली होती.

लोकसभा निवडणुकीवर केलेले भाष्य मार्क झुकेरबर्गवरला भोवणार! संसदीय समिती 'मेटा'ला बजावणार समन्स
लोकसभा निवडणुकीवर केलेले भाष्य मार्क झुकेरबर्गवरला भोवणार! संसदीय समिती 'मेटा'ला बजावणार समन्स (AFP)

Mark Zuckerberg on Indian Loksabha Election : गेल्या वर्षी भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचे खळबळजनक विधान  मेटा कंपनीचा मालक मार्क झुकेरबर्गने एका अमेरिकन पॉडकास्टमध्ये केली होती. त्यांच्या या व्यक्तव्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेत टीका केली आहे. भाजपचे मंत्री देखील यावरून आक्रमक झाले असून त्यांनी मार्क झुकेरबर्गचा निषेध केला आहे.  झुकेरबर्ग यांचं निवडणुकी बद्दलचं व्यक्तव्य निराधार असल्याचं म्हणत रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांनी झुकेरबर्ग यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता मेटाला  संसदीय समितीकडून समन्स पाठवले जाणार आहे.  

काय म्हणाला होता मार्क झुकेरबर्ग

मार्क झुकेरबर्ग यांनी भारतात गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकी बद्दल खळबळजनक विधान केलं होतं. कोविड १९  नंतर २०२४ जगभरात झालेल्या निवडणुकीत विद्यमान सरकारचा पराभव झाला होता. यात मार्कने भारताचा उल्लेख करत भाजपचा या निवडणुकीत पराभव झाल्याचं व्यक्तव्य केलं होती. प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टरने घेतलेल्या मुलाखतीत त्याने वरील व्यक्तव्य केलं होतं. २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकारे पडली, असा दावा त्यांनी यात केला होता. यावर भाजपचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टीका केली असून झुकेरबर्ग यांचा दावा खोटा असल्याचं म्हटलं होतं.  

मेटाला बजावणार समन्स 

भाजप खासदार आणि सभागृहाच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे म्हणाले की, चुकीची माहिती पसरवल्याबद्दल मेटाला समन्स बजावले जाणार आहे.  दुबे यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाविषयी चुकीच्या माहिती दिल्यामुळे देशाची  प्रतिमा मलीन झाली आहे. या चुकीबद्दल कंपनीने संसदेची आणि इथल्या जनतेची माफी मागावी.

१०  जानेवारी रोजी एका पॉडकास्टमध्ये ४०  वर्षीय फेसबुकचे व मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग म्हणाले की, कोविड महामारीमुळे जगभरातील विद्यमान सरकारांवरील जनतेचा  विश्वास कमी झाला आहे. यासंदर्भात त्यांनी भारताचे उदाहरण दिले. २०२४ या वर्षात  जगभरात निवडणूका झाल्या. भारतात देखील निवडणुका झाल्या. या निवडणुकट विद्यमान सरकारे मुळात प्रत्येक निवडणुकीत पराभूत झाली. जागतिक पातळीवर महागाई असो वा आर्थिक संकट, याचे मोठे कारण या पराभवा मागे होते. विविध देशांच्या सरकारांनी ज्या प्रकारे कोव्हिडशी लढा दिला, त्याचा परिणामही मोठा होता. यामुळे लोकांचा लोकशाही संस्थांवरील विश्वास कमी झाला, असा दावा झुकेरबर्ग याने केला होता.  

काय म्हणाले मंत्री अश्विनी वैष्णव ? 

झुकेरबर्गच्या वक्तव्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की,  जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख आहे.  २०२४  च्या निवडणुकीत ६४० दशलक्षांहून अधिक मतदारांनी या निवडणुकीत सहभाग घेतला. भारतातील जनतेने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास व्यक्त केला. कोविडनंतर २०२४   निवडणुकीत भारतासह बहुतांश विद्यमान सरकारे पराभूत झाल्याचा झुकेरबर्ग यांचा दावा तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा आहे. केंद्र सरकारने देशातील ८०  दशलक्ष लोकांना मोफत अन्न, २.२ अब्ज मोफत लस आणि कोविड दरम्यान जगभरातील देशांना मदत करण्यापासून भारताला सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे नेण्यापर्यंत, पंतप्रधान मोदी यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे देशातील जनतेने त्यांच्यावर तिसऱ्यांना विश्वास दाखवत निवडून दिले आहे. त्यांचा हा निर्णायक विजय सरकारचे  सुशासन आणि लोकांच्या विश्वासाची साक्ष आहे."

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर