Meta च्या सर्वरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने Facebook, Instagram आणि Threads यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागला. भारतासह जगभरातील मेटा यूजर्सचे अकाउंट आपोआप लॉगआउट झाले. त्यानंतर यूजर्सना आपले अकाउंट लॉगइन करण्यात खूपच दमछाक झाली. मेटाची मेसेजिंग सर्विस WhatsApp वरही याचा परिणाम दिसून आला नाही.
फेसबुक आणि इंस्टाग्राम डाउन झाल्यानंतर मेटाकडून प्रतिक्रिया दिली आहे. मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की, आमच्या वापरकर्त्यांना आमच्या सेवांपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत आहेत. आमच्याकडून यावर काम सुरू आहे.
अचानक आलेल्या या तांत्रिक अडचणींमुळे युजर्स चिंतेत असल्याचे दिसत आहे. मेटा प्लॅटफॉर्मच्या फेसबुक व इंस्टाग्राम अचानक बंद झाल्याने याबाबत लाखो वापरकर्त्यांनी ट्विटरवरून आणि इतर प्लॅटफॉर्मवरून तक्रार केली आहे.
मंगळवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाउन झाले. सोशल मीडिया अकाउंट अचानक लॉग आउट झाल्याच्या घटना घडल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभर ठप्प झाले. लॉग आऊट झाल्यानंतर युजर्सना लॉग इन करताच येत नसल्याचे दिसून आले. भारतीय वेळेनुसार अंदाजे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मेटा सर्वर डाऊन झाला.
सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सचे मालक एलन मस्क फेसबुक आणि इंस्टाग्राम डाउन झाल्याबाबत पोस्ट केली असून लिहिले आहे की, जर तुम्ही माझी पोस्ट पाहात आहात तर याचा अर्थ आहे की, आमचा सर्वर व्यवस्थित काम करत आहे.
ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टर.कॉम नुसार फेसबुक बंद झाल्यानंतर ३००,००० हून अधिक रिपोर्ट होते. फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्स वर ही समस्या येत होती. त्याचशिवाय मेटाच्या स्टेटस डॅशबोर्डने एप्लिकेशन प्रोग्रामिंग दाखवले होते की, व्हॉट्सएप बिझनेसच्या इंटरफेसमध्येही समस्या येत होत्या. मात्र Whatsaap आणि थ्रेड्ससाठी आउटेज खूप कमी होते.
संबंधित बातम्या