Viral News : जेफ बेझोस यांच्या प्रेयसीकडे पाहतानाचा मार्क झुकेरबर्ग यांचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : जेफ बेझोस यांच्या प्रेयसीकडे पाहतानाचा मार्क झुकेरबर्ग यांचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…

Viral News : जेफ बेझोस यांच्या प्रेयसीकडे पाहतानाचा मार्क झुकेरबर्ग यांचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…

Jan 21, 2025 08:07 AM IST

Mark Zuckerberg Viral Photo : मार्क झुकेरबर्ग हे पत्नी प्रिसिला चॅनसोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. या सह जगभरातील मोठे उद्योगपती देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

जेफ बेझोस यांच्या प्रेयसीकडे पाहतांना मार्क झुकेरबर्ग यांचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले....
जेफ बेझोस यांच्या प्रेयसीकडे पाहतांना मार्क झुकेरबर्ग यांचा फोटो झाला व्हायरल, नेटकरी म्हणाले.... (X/@CNviolations)

Viral News : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जगातील सर्वात श्रीमंतांपासून अनेक बड्या नामवंतांनी हजेरी लावली होती. त्यात मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांचाही समावेश होता. दरम्यान, सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याला नेटकऱ्यांनी  आता 'न्यू मीम' म्हटलं आहे. हा फोटो अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्या प्रेयसी लॉरेन्स सांचेझशी संबंधित आहे.

खरं तर व्हायरल फोटोमध्ये सांचेझ झुकेरबर्ग आणि बेझोस यांच्यामध्ये बसलेल्या दिसत आहेत. त्याचवेळी मेटाचे सीईओ हे त्यांच्याकडे एकटक बघत असल्याचं व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात परिधान केलेल्या कपड्यांमुळे सांचेझ आधीच सोशल मिडियावर ट्रोल झाली होती. त्यात आता सोशल मीडियात मार्क यांचा सांचेझकडे बघत असतांना फोटो व्हायरल झाल्याने या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी नेमकं काय सुरू आहे, असे म्हटलं आहे. 

झुकेरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅनसोबत या शपथविधी सोहळ्याला पोहोचल्या होत्या. ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीसाठी आयोजित समारंभात जगातील मोठ्या कंपन्यांचे सीईओही देखील उपस्थित होते.

झुकेरबर्ग आणि बेझोस यांच्याव्यतिरिक्त गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि ट्रम्प यांचे जवळचे सल्लागार इलॉन मस्क देखील या सोहळ्याला उपस्थित होते. अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक, रिलायन्स इंडस्ट्रीजचे भारतातील चेअरमन मुकेश अंबानी आणि टिकटॉकचे सीईओ चाऊ जी च्यू या वेळी उपस्थित होते.

ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सोमवारी शपथ घेतली. अमेरिकेच्या राजधानीत अत्यंत थंड हवामानामुळे कॅपिटल रोटुंडा (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचा सेंट्रल हॉल) येथे शपथविधी सोहळा पार पडला. यापूर्वी शपथविधी सोहळा मोकळ्या जागेत घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला होता.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर