Meta apologises : लोकसभा निवडणूक २०२४ मधील भाजपच्या पराभवाबद्दल मार्क झुकेरबर्गने केलेल्या व्यक्तव्याबद्दल मेटाने आता माफी मागितली आहे. मेटा ही फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीचे प्रमुख आणि स्थापना झुकेरबर्ग यांनी केली आहे.
कोरोना काळानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह जगातील बहुतांश देशांतील सरकारे कोसळली होती. नरेंद्र मोदी भारतात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत आणि भाजपने एकट्याने लोकसभेच्या २४० जागा जिंकल्या आहेत. त्यांनी केलेल्या या पोस्टवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत मार्क यांना नोटिस पाठवली होती. याशिवाय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर पोस्ट करत मेटाला या प्रकरणी जाब विचारला. यावर आता मेटाने प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर लिहिले की, 'जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात ६४ कोटी मतदार सहभागी झाले होते. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर विश्वास दाखवला आहे. कोरोना काळानंतर भारतासह जगातील बहुतांश सरकारे निवडणुकीत पराभूत झाली, जे चुकीचे असल्याचा दावा झुकेरबर्ग यांनी केला. ८० कोटी लोकांना मोफत रेशन, २.२ अब्ज लसी आणि कोरोना काळात जगभरातील देशांना मदत करणारा भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान मोदींचा सलग तिसरा विजय हा त्यांच्या कामगिरीवर लोकांचा विश्वास असल्याचा पुरावा आहे. मेटा : झुकेरबर्ग स्वत: चुकीची माहिती पसरवत आहे, हे पाहून नागरिक संतत्प झाले होते. त्यामुळे योग्य तथ्ये असल्याक्ष भाष्य करावे अशी मागणी भाजपने केली होती.
मेटाचे उपाध्यक्ष पब्लिक पॉलिसी शिवांत ठुकराल यांनी लिहिले की, "माननीय मंत्री अश्विनी वैष्णव. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुतांश सरकारे ही पडली. यात भाजपचा देखील समावेश आहे. मार्क यांचे विधान अनेक देशांच्या बाबतीत खरे होते. पण त्यांचे हे विधान भारताबद्दल चुकीचे आहे. या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो. मेटासाठी भारत हा अतिशय महत्त्वाचा देश आहे. मार्क झुकेरबर्ग यांच्या या वक्तव्याचा भाजप आणि सरकारकडून तीव्र निषेध करण्यात आला होता. या प्रकरणात झुकेरबर्गला समन्स बजावण्याची मागणीही करण्यात आली होती, पण मेटाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बिनशर्त माफी मागितली आहे.
संबंधित बातम्या