छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. नुकताच या चित्रपटाच्या स्क्रिनिंगशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक चित्रपटगृहात माफी मागताना दिसत आहेत. खरं तर या लोकांवर चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान वेदनादायक इमोशनल सीनदरम्यान हसल्याचा आरोप केला जातो.
नवी मुंबईतील कोपर खैरणे परिसरातील बालाजी मुव्हीप्लेक्स थिएटरमध्ये ही घटना घडली. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये मुघल बादशहा औरंगजेब मराठा शासक छत्रपती संभाजी महाराजांवर अत्याचार करताना दिसत आहे. या वेदनादायी दृश्यादरम्यान काही लोक हसत-होते, त्यानंतर तिथे बसलेल्या लोकांचा संताप उफाळून आला. यानंतर लोकांनी त्यांना पकडून गुडघे टेकायला आणि संभाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल माफी मागण्यास सांगितले.
त्यानंतर त्या लोकांना थिएटरमधून बाहेर फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावरील लोकही या प्रकारामुळे संतापले आहेत.
पाहा व्हिडिओ -
संबंधित बातम्या