Science News in Marathi : जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तो आपल्यासोबत काहीच नेत नाही. हेच जगातील शाश्वत सत्य आहे. अनेक धार्मिक ग्रंथात आणि आध्यात्मातही हेच तत्व सांगितले आहे. मात्र प्रश्न आहे की, व्यक्तीने जीवनभर जे अनुभव कमावले, आठवणी जपल्या त्या मृत्यूनंतरही जतन करून ठेवता येणे शक्य आहे का? या मौल्यवान आठवणी त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा मुख्य असतात. मात्र व्यक्तिच्या मृत्यूसोबत त्याच्या आठवणीही त्याच्यासोबत मिटल्या जातात. जगातील वैज्ञानिक अनेक वर्षापासून या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी धडपडत आहेत. एखाद्या मृत व्यक्तिच्या मेंदूतून त्याच्या आठवणी पुन्हा जतन करून ठेवता येणे शक्य आहे का? हा प्रश्न भलेही एखाद्या Sci-Fi फिल्मचा प्लॉट वाटू शकेल, मात्र न्यूरो सायन्सने इतकी प्रगती केली आहे की, या दिशेने शक्यता वाटू लागल्या आहेत. समजून घेऊया असे करणे किती कठीण आहे.
आपल्या आठवणी मेंदूतील न्यूरॉन्सच्या माध्यमातून तयार होतात. वैज्ञानिक डॉन अर्नोल्ड य़ांच्यानुसार आठवणी 'एंग्राम्स' च्या रुपात स्टोर असतात. हे एंग्राम्स मेंदूतील 'बायोलॉजिकल स्टोरेज डिवाइस' आहेत, जे आपल्या शॉर्ट-टर्म आणि लॉन्ग-टर्म आठवणी सांभाळतात. य़ाचा मुख्य स्रोत ममोरीतील 'हिप्पोकॅम्पस' आहेत. तर 'पॅरिटल लोब' सारख्या अन्य रचना सेंसर प्रमाणे काम करतात. वैज्ञानिकांनी प्राण्यांमधील एंग्राम्सचा शोध घेण्य़ात यश मिळवले आहेत. मात्र मानवाच्या मेंदूतील जटिलता सोडवमे खूपच आव्हानात्मक आहे.
आठवणी कधीच स्थिर नसतात. त्या वेळेनुसार बदलत असतात आणि मेंदूतील अन्य विविध भागात ट्रान्सफर होत राहतात. आठवणी मेंदूत स्थिर रहात नाहीत. मेमोरी कंसॉलिडेशन प्रक्रियेच्या दरम्यान आठवणी वेळेसोबत मेंदूच्या विविध भागात स्थिर होत जातात.
कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीतील मेमोरी एक्सपर्ट, चरन रंगनाथ यांनी सांगितले की, आठवणी सामान्यपणे संपूर्ण घटनेचे संपूर्ण चित्रण करत नाहीत. आपण केवळ अनुभवातील काही भाग आठवणीत ठेवत असतो. अन्य माहिती मेंदू स्वत:हून जोडते. एंग्राम्स, जे आठवणींना संग्रहित करतात, मात्र एखाद्या घटनेचे संपूर्ण नोंद नसते, तर केवळ त्या न्यूरॉन्सचे स्थान सांगतात जे आठवणीशी जोडलेले असतात.
सध्याच्या काळात अशी कोणतीही पद्धत किंवा तंत्रज्ञान अस्तित्वात नाही, जे मेंदूतील न्यूरॉन्सचे य़ोग्य पध्दतीने मॅपिंग करू शकेल. यासाठी एका व्यक्तिच्या आयुष्यभरातील आठवणींचे सविस्तर आणि सतत ट्रॅकिंग करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती आपल्या पाचव्या वाढदिवसा दिवशीच्या घटना आठवू शकतो. मात्र तो प्रत्येक पाहुणा किंवा त्या दिवसाचे हवामान आठवू शकणार नाही.
आजच्या काळात मनुष्याच्या आठवणी मृत्यूनंतर पुन्हा आठवणी मिळवणे व जतन करून ठेवणे शक्य वाटत नाही. मात्र भविष्यात काय होई सांगता येत नाही. तर येणाऱ्या काळात असे तंत्रज्ञान विकसित झाले तरी आठवणींचे सतत गतिशील असणे, ही समस्या आणखी जटील बनवेल.
संबंधित बातम्या