Melania Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या मताधीक्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. २५ जानेवारी २०२५ मध्ये ते अमेरिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांच्या पत्नी व फर्स्ट लेडी असलेल्या मेलानिया ट्रम्प यांनी केलेली मागणी सध्या चर्चेत आहेत. मेलानिया ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमध्ये स्वतंत्र बेडरूम हवे आहे. या बाबतची मागणी त्यांनी केली असून यावरून दोघांचे संबंध ठीक नसल्याचं बोललं जात आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व मेलानिया ट्रम्प यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. त्यात मेलानिया यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्वतंत्र बेडरूमची मागणी केली आहे. ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी मावळत्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या दारुण पराभव करून विजय मिळवल्यानंतर मेलानिया या दुसऱ्यांदा अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून काम करणार आहेत.
एका वृत्तसंकेत स्थळानुसार मेलानिया यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्वत:साठी वेगळ्या बेडरूमची केलेली मागणी ही नवी नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसच्या मास्टर सुटमध्ये राहत होते, तर तिसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांच्या सूटमध्ये मेलानिया राहत होत्या. त्यामुळे जर त्या या ठिकाणी राहिल्या नाहीत तर त्या स्वतंत्र राहण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने हा दावा फेटाळून लावला आहे.
मेलानिया या एकेकाळी स्टार मॉडेल म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचा जन्म स्लोव्हेनियामध्ये झाला. त्या जुलै २००६ मध्ये अमेरिकेच्या नागरिक बनल्या. सुपरमॉडेल मेलानिया या प्रामुख्याने न्यूयॉर्क शहर आणि फ्लोरिडाच्या पाम बीच या ठिकाणी त्यांचा पुढील बराच कालावधी घालवणार आहेत. याची माहिती यापूर्वीच देण्यात आली आहे.
मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा एकुलता एक मुलगा बॅरॉन हा न्यूयॉर्क विद्यापीठात (एनवाययू) शिकतो, तर पाम बीचवर त्यांचा मार-ए-लागो हा भव्य बंगला आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे यांचे हे निवासस्थान आहे.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात फ्लोरिडामध्ये मुक्काम करण्याचा मेलानिया यांचा निर्णय आहे. ट्रम्प हे २० जानेवारीरोजी शपथ घेतील. मलेनिया या व्हाईट हाऊसमध्ये पूर्णवेळ राहणे अपेक्षित नसले तरी त्या अधिकृत कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ट्रम्प दाम्पत्य २२ जानेवारीला त्यांच्या लग्नाचा २० वी अॅनिव्हर्सरी साजरी करणार आहेत.