मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  missile woman of india : भारताच्या 'या' मिसाईल वुमननं चीनला दिला धक्का! दिव्यास्त्राच्या निर्मितीत मोलाचा वाटा

missile woman of india : भारताच्या 'या' मिसाईल वुमननं चीनला दिला धक्का! दिव्यास्त्राच्या निर्मितीत मोलाचा वाटा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 13, 2024 08:11 AM IST

mission divyastra project director Sheena Rani: भारताने (india missile program) सोमवारी मिशन दिव्यास्त्र प्रकल्पा अंतर्गत ६ किमी पल्ल्याच्या एमआयआरव्ही तंत्रज्ञानाणे सुसज्ज क्षेपाणास्त्र अग्नि ५ ची यशस्वी चाचणी केली. या प्रकल्याच्या प्रमुख शिना राणी यांचे कौतुक होत आहे.

भारताच्या 'या' मिसाईल वुमननं चीनला दिला धक्का!  दिव्यास्त्राच्या निर्मितीत मोलाचा वाटा
भारताच्या 'या' मिसाईल वुमननं चीनला दिला धक्का! दिव्यास्त्राच्या निर्मितीत मोलाचा वाटा

mission divyastra project director Sheena Rani: स्वदेशी एव्हियोनिक्स प्रणाली आणि उच्च-अचूक सेन्सर पॅकेजने सुसज्ज अग्नि-५ या एमआयआरव्ही तंत्रज्ञाने सुसज्ज असलेल्या क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी डीआरडीओच्या पथकाचे नेतृत्व क्षेपणास्त्र तज्ञ आर. शीना राणी यांनी केले. या सोमवारी डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. शिना राणी या ५७ वर्षांच्या असून त्या डीआरडीओच्या हैदराबाद येथील अॅडव्हान्स सिस्टिम लेब्रोटरीच्या ( DRDO Advanced Systems Laboratory, ASL) कार्यक्रम संचालक म्हणून कार्यरत आहेत.

bharat jodo nyay yatra : भारत जोडो न्याय यात्रा पोहचणार मालेगावात! शरद पवार, संजय राऊत राहणार उपस्थित

राणी यांच्या नेतृत्वाखाली डीआरडीओने अनेक अण्वस्त्रांसह क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केल्या आहे. यामुळे भारत केवळ जगातील बलाढ्य देशांच्या यादीत सामील झाला असून यामुळे आता चीनची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे.

तब्बल ६ हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र भारताच्या जवळपास सर्व शेजारी देशांना आपल्या माऱ्याच्या टप्प्यात आणले आहे. मल्टिपल इंडिपेंडेंट टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MI RV) तंत्रज्ञान अंतर्गत, एका क्षेपणास्त्रात एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे आणि या शस्त्रांद्वारे वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करता येणे शक्य झाले आहे. अग्नि-५ ची स्ट्राइक रेंज ५ हजार किलोमीटर आहे आणि देशाच्या दीर्घकालीन सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र जवळजवळ संपूर्ण आशिया खंड आणि काही युरोपीय देशांवर हल्ला करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात संपूर्ण चीन तसेच युरोपचा काही भाग समाविष्ट आहे. अग्नी १ ते ४ क्षेपणास्त्रांचा पल्ला ७०० किमी ते ३,५०० किमी आहे. हे क्षेपणास्त्र यापूर्वीच तैनात करण्यात आले आहेत.

Job Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी! जूनच्या तिमाहीत कंपन्या करणार मेगा भरती

मिसाईल राणी या नावाने प्रसिद्ध असलेल्या शीना यांनी यापूर्वी इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये आठ वर्षे काम केले आहे. १९९८ मध्ये पोखरण अणुचाचणीनंतर लगेचच त्या १९९९ मध्ये DRDO मध्ये रुजू झाल्या. तेव्हापासून त्या अग्नी क्षेपणास्त्र प्रकल्पावर सतत काम करत आहे. क्षेपणास्त्र कार्यक्रमांतर्गत अग्निचे अनेक प्रकार त्यांच्या नेतृत्वाअंतर्गत विकसित करण्यात आले आहेत. तसेच हे क्षेपणास्त्र सैन्यात समाविष्ट देखील करण्यात आले आहेत.

Sunetra Pawar: तुम्ही साथ दिली तर मोठे पाऊल उचलेन! बारामती लोकसभेबाबत सुनेत्रा पवारांचं मोठ विधान

तथापि, नवीन MIRV तंत्रज्ञाना असलेल्या काही मोजक्या देशांच्या यादीत भारत पोहचला असून या साठी शिना राणी यांचे योगदान मोठे आहे. शिना राणी त्यांनी व त्यांच्या डीआरडीओच्या पथकाने हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात सर्व काही पणाला लावले होते. शिना त्यांच्या टीममध्ये अनेक महिला शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. त्या म्हणाल्या, "अग्नी क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग असल्याचा मला खरोखर अभिमान आहे. कारण ही क्षेपणास्त्रे देशाच्या सीमांचे रक्षण सक्षमपणे करत आहेत."

शिना राणी यांचा जन्म तिरुअनंतपुरममध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे त्या दहावीत असतांना निधन झाले. त्यांना त्यांच्या आईने वाढवले. "माझी आई माझ्या आणि माझ्या बहिणीच्या जीवनाचा खरा आधारस्तंभ आहे," असे शिना म्हणतात.

एका वृतपत्राशी बोलतांना राणी म्हणाल्या, "जेव्हा आम्ही प्रक्षेपणाची तयारी करत होतो तेव्हा माझ्या पोटात गोळा आला होता. जेव्हा भारताने १९ एप्रिल २०१२ रोजी पहिल्यांदा अग्नी-५ ची चाचणी केली आणि संपूर्ण जगाने त्याची दखल घेतली होती.

राणीचे पती पी. एस. आर. एस. शास्त्री हे देखील शास्त्रज्ञ असून डीआरडीओसोबत अनेक क्षेपणास्त्र प्रणालीवर त्यांनी काम केले आहेत. ते भारताचे मिसाईल मॅन, माजी डीआरडीओ प्रमुख आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरित झाले होते.

IPL_Entry_Point