निळ्या ड्रमनंतर आता काळा साप प्रकरण! प्रियकरासोबत मिळून पत्नीने शांत डोक्याने काढला पतीचा काटा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  निळ्या ड्रमनंतर आता काळा साप प्रकरण! प्रियकरासोबत मिळून पत्नीने शांत डोक्याने काढला पतीचा काटा

निळ्या ड्रमनंतर आता काळा साप प्रकरण! प्रियकरासोबत मिळून पत्नीने शांत डोक्याने काढला पतीचा काटा

HT Marathi Desk HT Marathi
Published Apr 17, 2025 04:25 PM IST

हत्या लपवण्यासाठी मृत अमित कश्यपच्या खाटेखाली सापही फेकण्यात आला होता. प्रथमदर्शनी अमितचा मृत्यू सर्पदंशाने झाला असावा, असे पोलिसांना वाटत होते, मात्र घरच्यांना सुरुवातीपासूनच ही हत्या असल्याचा संशय होता. त्यांच्या आग्रहाखातर अमित कश्यपचे शवविच्छेदन करण्यात आले आणि सत्य समोर आले.

 अमित कश्यप मर्डर केस
अमित कश्यप मर्डर केस

मेरठच्या सौरभ हत्या प्रकरणाच्या भयानक आठवणी अजूनही लोकांच्या मनातून पुसल्या गेलेल्या नसताना याच दरम्यान शहरात अशीच आणखी एक हत्या घडली आहे. मेरठमधील अकबरपूर सादात गावात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार लोकांना सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून लपवण्यासाठी मृत अमित कश्यपच्या खाटेखाली सापही फेकण्यात आला होता. प्रथमदर्शनी अमितचा मृत्यू सर्पदंशाने झाला असावा, असे पोलिसांना वाटत होते, मात्र घरच्यांना सुरुवातीपासूनच कट असल्याचा संशय होता. त्यांच्या आग्रहाखातर अमित कश्यपचे शवविच्छेदन करण्यात आले आणि अहवाल आल्यावर संपूर्ण सत्यही समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिकी उर्फ अमित कश्यप याचा मृतदेह रविवारी त्याच्या बेडवर सापडला होता. त्याच्याजवळ एक साप आढळला असून अनेक ठिकाणी त्याच्या शरीरावर चाव्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. यामुळे अमितचा सर्पदंशाच्या घटनेत मृत्यू झाल्याचा संशय शेजारी आणि पोलिसांना आला. परंतु शवविच्छेदन अहवालात कुटुंबीयांचा संशय खरा असल्याचे सिद्ध झाले. अमितचा मृत्यू सर्पदंशाने नव्हे तर गुदमरून झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. हे लक्षात येताच पोलिसांनी आपला तपास अधिक तीव्र केला. अखेर त्याला अमितची पत्नी रविताची वागणूक संशयास्पद वाटली आणि पोलिसांनी तिला अटक करून चौकशी सुरू केली. यानंतर तिचा प्रियकर अमरदीप यालाही अटक करण्यात आली होती. दोघांनी मिळून अमितची हत्या केल्याची कबुली दिली असून त्यांचे अनैतिक संबंध होते.

मेरठ ग्रामीणचे एसपी राकेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, अमरदीपने एक साप १००० रुपयांना विकत घेतला होता. मेरठमधील महमूदपूर सिखेडा गावातील एका सर्पमित्राकडून त्याने हा साप घेतला होता. खुनाच्या रात्री रवीता आणि अमरदीप अमित कश्यप झोपेपर्यंत वाट पाहत होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरावर साप सोडण्यात आला, ज्याने त्याला अनेकवेळा चावा घेतला. अमितचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे त्यांना सर्वांना दाखवायचे होते. अमितला साप चावला आणि त्यातून त्याचा मृत्यू झाला, असा समज जमलेल्या लोकांचा झाला. यामुळे त्यांचा हेतू सफल झाला होता. इतकंच नाही तर साप पकडण्यासाठी सर्पमित्रालाही पाचारण करण्यात आले आणि त्याने अमितचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचेही सांगितले. त्यानंतर वनविभागाने त्या सापाला जंगलात सोडले.

गावकऱ्यांना आधीच अवैध संबंधाचा संशय,अमितलाही लागला होता सुगावा -

सर्पदंशाने अमितचा मृत्यू झाला हे घरच्यांना पटत नव्हते. त्यांना षडयंत्राची भीती वाटत होती. काही गावकऱ्यांनी शवविच्छेदन करण्याची सूचना ही केली आणि मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. खुनाचा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी रविता आणि अमरदीप याला अटक केली. दोघांनी सांगितले की, ते वर्षभर रिलेशनशिपमध्ये होते. अमितसोबत मजुरीचे काम करणारा अमरदीप अनेकदा त्याच्या घरी येत असे. गावकऱ्यांना आधीपासूनच दोघांवर संशय होता. त्यामुळे अमितच्या आकस्मिक मृत्यूवर लोकांनी संशय व्यक्त केला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितला काही काळापूर्वी पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली होती आणि तो विरोध करत होता. यामुळे दाम्पत्याने त्याची हत्या केली. या हत्येपूर्वी या दोघांनी गुगल आणि यूट्यूबवरही हत्येचे अनेक प्रकार पाहिले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर