मासे आहेत की सेक्स मशीन! दिवसाला तब्बल १९-१९ वेळा करतात संभोग, रिसर्चमध्ये खुलासा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मासे आहेत की सेक्स मशीन! दिवसाला तब्बल १९-१९ वेळा करतात संभोग, रिसर्चमध्ये खुलासा

मासे आहेत की सेक्स मशीन! दिवसाला तब्बल १९-१९ वेळा करतात संभोग, रिसर्चमध्ये खुलासा

Feb 04, 2025 03:27 PM IST

Medakafish : जपानी वैज्ञानिकांनी तेथे विपुल प्रमाणात आढळणाऱ्या मेडाका माशांवर रिसर्च केला. त्यावेळी समोर आले की, हा आकाराने छोटा मासा एका दिवसात सरासरी १९ वेळा सेक्स करू शकतो.

पांढच्या व सोनेरी रंगाचे मेडका मासे
पांढच्या व सोनेरी रंगाचे मेडका मासे

Science News in Marathi : जगात अनेक  पुरुष सेक्सच्या समस्येने ग्रस्त आहेत. पुरुषांना एकदा सेक्स केल्यानंतर दुसऱ्यांना तयार होण्यासाठी वेळ लागतो. य़ाला 'रीफ्रॅक्टरी पीरियड'  म्हणतात. या तुलनेत महिला अधिक काळ ऑर्गेज्मचा अनुभव घेऊ शकतात. प्रत्येक पशूला स्पर्म कोशिका रिलीज करणे हे ताकद व वेळेवर अवलंबून असते. प्रजननाची ही प्रक्रिया त्यांच्या जीवनात भोजन आणि पाण्याइतकीच महत्वाचीच आहे. सजीवांमध्ये स्पर्म निर्मितीची मर्यादा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी जपानी वैज्ञानिकांनी तेथे विपुल प्रमाणात आढळणाऱ्या मेडाका माशांवर (Oryzias latipes) रिसर्च केला. त्यावेळी समोर आले की, हा आकाराने छोटा मासा एका दिवसात सरासरी १९ वेळा सेक्स करू शकतो. हा रिसर्च Royal Society Open Science  जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

अधिकांश मासे प्रजननासाठी बाहेरून निषेचन (external fertilization) चा वापर करतात. म्हणजेच मादी मासे शरीराच्या बाहेर अंडी सोडतात जे पाण्याच्या तळात किंवा दगडांच्या मध्ये जमा होतात. नर मासे अंड्यांच्या वर जाऊन दिवसातून अनेक वेळा आपले शुक्राणू सोडतात. यामुळे अंडी फर्टीलाईज होतात व माशांची उत्पत्ती होते. काही मासे निषेचित अंडी रोपट्यांवर जमा करतात.

मेडका मासा म्हणजे सेक्स मशीन!

मेडका माशांना जपानी राइसफिश म्हटले जाते. हा जवळपास १.४  इंच लांब असतो. मेडाका, जपानमध्ये धान्याची शेते, तलाव, दलदल, नदींच्या प्रवाहात आणि अन्य जलाशयात आढळतो. हा खुपच सुंदर व प्रसिद्ध माशांचा प्रकार असून जगभरातील एक्वेरियमची शोभा वाढवत आहे. 

स्टडीचे को-ऑथर आणि ओसाका मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटीमध्ये इवोल्यूशनरी इकोलॉजिस्ट, युकी कोंडो यांनी सांगितले की, मेडाका मासे अशा माशांपैकी आहेत जे अंडी देतात. पाण्यात अंडी व शुक्राणूचे मिलन होऊन नवीन माशांची पैदास होते. शुक्राणुंची संख्या आणि सतत संभोगाच्या दरम्यान निषेचन दर वैज्ञानिकांसाठी एक रहस्य बनले आहे. 

स्टडीमध्ये  वैज्ञानिकांनी नव्या पद्धतीने मेडाकाच्या शुक्राणुंची संख्या मोजली. प्रयोगाच्या एक दिवस आधी वेगवेगळ्या प्रजनन टँकमधून निवडलेले नर आणि मादी माशांना वेगवेगळ्या काचेच्या मोठ्या भांड्यात ठेवले. दुसऱ्या दिवशी एक नर व मादी माशाला एकत्र ठेवले गेले. त्यांच्या हालचालीवर २० मिनिटांपर्यंत नजर ठेवली गेली. त्यानंतर नर माशाला दुसऱ्या मादीसोबत वेगळ्या टँकमध्ये ठेवले गेले. 

ही प्रक्रिया तोपर्यंत केले गेली जोपर्यंत नर मासा सलग तिसऱ्यांना तीन मादी माशांसोबत संभोग करण्यात अयशस्वी झाला. मादांच्या पोटातून अंडी काढून पेट्री डिशमध्ये ठेवण्यात आले, जेणेकरून निषेचन दर समजू शकेल.

कशाचा शोध लागला?

स्टडीमध्ये समजले की, नर मेडाका मासा दिवसाला सरासरी १९ वेळा संभोग करू शकतो. सुरुवातीला तीन वेळच्या संभोगात नर आपल्या दैनिक शुक्राणु उत्पादनापैकी ५० टक्क्यांहून अधिक शुक्राणू रिलीज करतात. सुरुवातीच्या सेक्स क्रियामध्ये निषेचन दर जवळपास १०० टक्के असते. मात्र १० व्या राउंडनंतर हा दर खूपच कमी होत जातो. शेवटच्या काही फेऱ्यात निषेचनाची पुष्टी झाली नाही.

मादा मेडका मासे दररोज अंड्यांची निर्मिती करू शकतात मात्र संभोगावेळी त्या आपली सर्व अंडी बाहेर सोडतात. जेव्हा मादा अशा नराशी मिळते ज्याने अधिकांश शुक्राणु आधीच खर्च केले आहेत. त्यावेळी अंडी वाया जातात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर