मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal : एक दिवसासाठी ED-CBI मला सोपवा; अर्धा भाजप तरुंगात जाईल, केजरीवालांचा हल्लाबोल

Arvind Kejriwal : एक दिवसासाठी ED-CBI मला सोपवा; अर्धा भाजप तरुंगात जाईल, केजरीवालांचा हल्लाबोल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 25, 2022 04:05 PM IST

Arvind Kejriwal on Bjp : दिल्ली महापालिका निवडणूक प्रचारात दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर सडकून टीका केली. केजरीवाल म्हणाले की, जर ईडी व सीबीआय एक दिवसासाठी माझ्याकडे सोपवल्यास अर्धा भाजप तुरुंगात जाईल.

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

दिल्ली – दिल्ली महापालिकांची (Mcd polls 2022) ऱणधुमाळी सुरू आहे. यामध्ये गेल्या १५ वर्षापासून असणारी भाजपची सत्ता हिसकावण्यासाठी आपने चांगलीच कंबर कसली आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटले की, विरोधकांना राष्ट्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवली जात आहे. तरीही भाजपच्या हाताला काही लागत नाही. केवळ एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दिल्ली एमसीडी निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पक्षांनी प्रचार मोहिमेवर भर दिला आहे. गेल्या १५ वर्षांपासून एमसीडीमध्ये भाजपची सत्ता आहे आणि ती सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपसमोर आम आदमी पक्षाचे कडवं आव्हान आहे.

अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप करत म्हटले की, आम्ही एमसीडीला गेल्या ५ वर्षांत १ लाख कोटी रुपये दिले, पण भाजपच्या लोकांनी सर्व पैसे हडप केले. या लोकांना मोठा भ्रष्टाचार केला आहे. यांनी थोडंतरी काम केलं असतं तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं असतं.

केंद्र सरकारने आपचे नेते सत्येंद्र जैन व मनिष सिसोदिया यांच्यावर ईडीच्या धाडी टाकल्या. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की, एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्याकडे सोपवा, भाजपचे निम्मे लोक तुरुंगात जातील. आमच्यावर अनेक खटले दाखल झाले, तरीही काहीही सिद्ध होऊ शकलं नाही. हे लोक सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना भ्रष्ट म्हणतात. मनीषनं दारू घोटाळा केला, १० कोटी खाल्ल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतके छापे टाकूनही काही सापडलं नाही, मग १० कोटी रुपये गेले कुठे? असा सवाल करत खरा भ्रष्टाचार गुजरातमध्ये मोरबी पूल निर्माणकार्यात झाल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या