अमेरिकेतील मिसौरी राज्यातील एका गणिताच्या शिक्षिकेने आपल्या १६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याची कबुली दिली आहे. आता महिला शिक्षिकेला तुरुंगात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपली फिगर दाखवण्यासाठी तिने विद्यार्थ्यासमोर टाइट लेगिंग्स आणि लो कट टॉप परिधान करत असते. २६ वर्षीय हेली क्लिफ्टन हिने विद्यार्थ्यांसमोर मुद्दाम रिवीलिंग कपडे घातले होते आणि लैंगिक संबंध ठेवताना मुलांच्या पाठीवर आपल्या नखाचे व्रण सोडले होते. मात्र, यावेळी विद्यार्थ्याच्या वडिलांना संपूर्ण घटनेची माहिती होती, मात्र तरीही ते काहीच बोलले नाहीत आणि दोघांचे नाते कायम राहू दिले.
'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, दोन मुलांची आई असलेल्या हेलीला शाळा प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आले की, ती विद्यार्थ्यांच्या खूप क्लोज आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर हॅलीला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. हॅली आणि विद्यार्थ्याचे संबंध असताना इतर विद्यार्थी त्यांच्यावर लक्ष ठेवायचे, जेणेकरून इतर कोणी ही दोघांना पाहू शकणार नाही. सुरुवातीला हॅली यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आणि नंतर आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी टेक्सासला गेली. हे अफेअर समोर आल्यानंतर हेलीच्या घटस्फोटाची परिस्थिती आणखी चव्हाट्यावर आली. प्रत्यक्षदर्शींनी काही फोटो पोलिसांना दाखवले त्यामध्ये सेक्स करताना मुलाच्या पाठीवर उमटलेल्या खूणा आहेत.
पोलिस अधिकारी स्टोमबॉग यांनी सांगितले की, हा अक्षम्य गुन्हा आहे. या परिस्थितीची माहिती मिळताच आम्ही तातडीने कारवाई केली. ८ डिसेंबर २०२३ पासून हा कर्मचारी जिल्ह्यात आलेला नाही आणि तो परत येईल अशी आमची अपेक्षा नाही. हेलीची ही पहिलीच शिक्षकी नोकरी होती, ज्यावर ती दीड वर्षांपासून काम करत होती, अशी टिप्पणीही स्टोमबॉग यांनी केली. हे आरोप पहिल्यांदा ७ डिसेंबर रोजी समोर आले होते. त्यानंतर ५ जानेवारी रोजी हॅलीला अटक करण्यात आली आणि तिच्यावर एका विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध, बलात्कार, मुलाचे कल्याण धोक्यात आणणे आणि बाल शोषणाचे आरोप ठेवण्यात आले.
हॅलीच्या फोनवर मेसेज सापडले ज्यात तिचे तिच्या विद्यार्थ्याशी प्रेमसंबंध असल्याचे सूचित होते. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला होता.पीडितेचे वडील मार्क क्रेटन यांना आपल्या मुलाचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याची माहिती होती. अभियोजकांच्या म्हणण्यानुसार, मार्कला त्याच्या अल्पवयीन मुलगा आणि २६ वर्षीय महिला शिक्षिकेच्या नात्याबद्दल माहिती होती आणि त्याने माहिती देण्याऐवजी ते लपवणे सुरू ठेवले आणि संबंध चालू ठेवण्यास परवानगी दिली, अगदी हॅलीला त्याच्या घरी येऊन मुलाला भेटण्याची परवानगी दिली.