Massive Fire at Firecracker Factory In Nashik: नाशिक येथील शिंदेगाव येथे दुपारी फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत एक कामगार भाजला असून त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. अनेक कामगार गोदामात अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
गौरव विसपुते यांच्या शिंदेगावात श्री स्वामी समर्थ नावाचे फटाक्यांचे गोदाम आहे. आज दुपारी एक वाजाताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच रहिवाशांनी नाशिकरोड अग्निशामक केंद्र आणि पोलिसांना कळवले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले की, 'गोदामात फटाक्यांचे साहित्य आणण्यात आलेले गोदाम आणि ट्रक जळून खाक झाला. गोदामातील दोन कर्मचारी, ट्रक चालक आणि क्लिनर असे चौघे जण भाजले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे गिरी यांनी सांगितले.
मुंबईतील लोअर परेल पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला शुक्रवारी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सकाळी ६.३० च्या सुमारास आग लागली.शॉट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याआधी २९ डिसेंबर २०१७ रोजी कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटमध्ये आग लागली होती. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, १९ जण भाजले असून त्यांना सायन आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.