मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Maruti Suzuki : बाजारात येताक्षणीच भराभर होईल 'या' CNG गाडीचं बुकींग

Maruti Suzuki : बाजारात येताक्षणीच भराभर होईल 'या' CNG गाडीचं बुकींग

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Aug 11, 2022 11:58 AM IST

Maruti Suzuki New CNG Car : सध्या सीएनजी कारची मागणी प्रचंड आहे. सीएनजी हा स्वस्त पर्याय तर आहेच, पण मायलेजच्या बाबतीतही तो चांगला पर्याय आहे.

मारूती सुझुकीची नवी सीएनजी कार
मारूती सुझुकीची नवी सीएनजी कार (हिंदुस्तान टाइम्स)

मारुती सुझुकीकडे CNG वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. कंपनी जास्तीत जास्त कारसाठी CNG पर्याय सादर करण्यावर काम करत आहे. सध्या सीएनजी कारची मागणी प्रचंड आहे. सीएनजी हा स्वस्त पर्याय तर आहेच, पण मायलेजच्या बाबतीतही तो चांगला पर्याय आहे. मारुतीने या वर्षी सेलेरियो आणि डिझायर लाँच करून CNG पोर्टफोलिओचा विस्तार केला. सेलेरियो CNG जानेवारीमध्ये ६ लाख ५८ हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली होती. डिझायर सीएनजी मार्चमध्ये ८ लाख १४ हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली होती. सीएनजी पर्यायासह ऑफर केलेल्या मारुती कारमध्ये अल्टो, वॅगनआर, अर्टिगा आणि इको यांचा समावेश आहे. कंपनी ब्रेझा आणि काही नेक्सा श्रेणीतील वाहने सीएनजीमध्ये लॉन्च करण्याचा विचार करत आहे.

  • स्विफ्ट सीएनजी

डिझायर प्रमाणे, मारुती स्विफ्ट देखील CNG च्या पर्याय VXi आणि ZXi प्रकारांमध्ये लॉन्च केली जाईल. मारुतीची सीएनजी वाहने पेट्रोल वाहनांपेक्षा महाग आहेत. स्विफ्ट VXI 5MT पेट्रोल आणि ZXI 5MT पेट्रोल प्रकारांची किंमत अनुक्रमे ६ लाख ८२ हजार रुपये आणि ७ लाख ५० हजार रुपये आहे.

  • कधी सुरू होईल बुकींग

मारुती डीलरशिपने स्विफ्ट सीएनजीचे ११ हजार रुपयांचे अन ऑफिशियल बुकिंग सुरू केले आहे. येत्या आठवडाभरात ते अधिकृतपणे सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय, कंपनी नवीन Alto K10 लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्याचे बुकिंग अधिकृतपणे सुरू झाले आहे.

  • किती आहे स्विफ्ट सीएनजी मायलेज

डिझायर सीएनजी सध्या सर्वाधिक मायलेज देणारी सीएनजी सेडान आहे, जी ३१.१२ किमी/किलो मायलेज देते. स्विफ्ट सीएनजी सुमारे ३० ते ३५ किमी/किलो इतके जास्त मायलेज देईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग