देशाच्या रक्षणासाठी शहीद झाले वडील, मुलीच्या लग्नात कन्यादान करण्यासाठी पोहोचले CRPF जवान, नेटीझन्सकडून कौतुक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  देशाच्या रक्षणासाठी शहीद झाले वडील, मुलीच्या लग्नात कन्यादान करण्यासाठी पोहोचले CRPF जवान, नेटीझन्सकडून कौतुक

देशाच्या रक्षणासाठी शहीद झाले वडील, मुलीच्या लग्नात कन्यादान करण्यासाठी पोहोचले CRPF जवान, नेटीझन्सकडून कौतुक

Nov 26, 2024 08:20 PM IST

वडिलांचे कर्तव्य बजावत सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी कन्यादान केले आणि संपूर्ण गावाने आपल्या मुलीला आशीर्वाद देऊन निरोप दिला. शहीद सतीश यांच्या मुलीला आपल्या वडिलांची लग्नात कमतरता जाणवू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले.

सीआरपीएफ जवानांनी केले शहीद जवानाच्या मुलीचे कन्यादान
सीआरपीएफ जवानांनी केले शहीद जवानाच्या मुलीचे कन्यादान

सीआरपीएफचे डीआयजी कोमल सिंह यांच्या टीमने हरियाणातील जींद मध्ये शहीद सतीश कुमार यांची मुलीचे कन्यादान केले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेट युजर्संनी त्याचे कौतुक केले आहे. हा हृदयस्पर्शी आणि स्तुत्य उपक्रम असल्याचे वर्णन केले आहे. 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शहीद जवानाची मुलगी निशाच्या लग्नाला सीआरपीएफचे अनेक जवान उपस्थित आहेत. वधू-वर आपल्या शहीद वडिलांचा फोटो घेऊन सोफ्यावर बसले आहेत. त्याच्या मागे उभे असलेले सैनिक त्याला आशीर्वाद देताना दिसत आहेत. सतीश कुमार २० मार्च २०१५ रोजी जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे शहीद झाले होते. आपल्या शहीद साथीदाराच्या मुलीचे कन्यादान करून जवानांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

सतीश कुमार हे हरियाणातील जींद जिल्ह्यातील उचाना येथील छतर गावचे रहिवासी होते. शनिवारी शहिद सतीश यांची मुलगी निशा हिचा विवाह सोहळा पार पडला. वधू पक्षाच्या वतीने सीआरपीएफच्या जवानांनी वऱ्हाडी मंडळींचे जोरदार स्वागत केले. वडिलांचे कर्तव्य बजावत सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी निशाचे कन्यादान केले आणि संपूर्ण गावाने आपल्या मुलीला आशीर्वाद देऊन निरोप दिला. 

शहीद सतीश यांच्या मुलीला लग्नात आपल्या वडिलांची कमतरता जाणवू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. डीआयजी कोमल सिंह, डेप्युटी कमांडंट वेदपाल, असिस्टेंट कमांडंट कृष्ण कुमार आणि अन्य सैनिक ग्रुप सेंटर सोनीपत येथून जींद येथे पोहोचले होते. 

'आमचं रक्ताचं नातं नाही, तर ती आमच्या कुटुंबाची मुलगी आहे'

सीआरपीएफचे अधिकारी आणि जवान गावात दाखल होण्याची प्रक्रिया सकाळी सुरू झाली. त्यांनी ग्रामस्थांसह लग्नाचे संपूर्ण वातावरण तयार केले. सीआरपीएफचे डीआयजी कोमल सिंह यांनी पीटीआयला सांगितले की, निशा ही शहीद सतीश यांची मुलगी आहे. आमचे तिच्याशी रक्ताचे नाते नाही, पण ती आमच्या घरची मुलगी आहे. ती सीआरपीएफ परिवाराचा भाग आहे. त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी आम्ही आलो आहोत. आपल्या वडिलांनी सर्वोच्च बलिदान दिले याचा अभिमान वाटावा म्हणून आम्ही आलो आहोत. 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर