विधवा वहिनीशी लग्न करून गेला नेपाळला, ८ वर्षांनी घरी परतल्यावर कुटुंबीयांनी दिली भयंकर शिक्षा-marrying widowed sister in law proved costly family killed son in bihar ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विधवा वहिनीशी लग्न करून गेला नेपाळला, ८ वर्षांनी घरी परतल्यावर कुटुंबीयांनी दिली भयंकर शिक्षा

विधवा वहिनीशी लग्न करून गेला नेपाळला, ८ वर्षांनी घरी परतल्यावर कुटुंबीयांनी दिली भयंकर शिक्षा

Aug 12, 2024 04:44 PM IST

Bihar Crime : विधवा वहिनीशी विवाह करणाऱ्या लहान दीराला मृत्यूदंड दिला आहे. आरोपी दुसरे-तिसरे कोणी नसून त्याचे कुटुंबीयच आहेत. तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह चादरीत गुंडाळून फेकण्यात आला.

विधवा वहिनीशी विवाह करणे तरुणाला महागात पडलं.
विधवा वहिनीशी विवाह करणे तरुणाला महागात पडलं.

भावाच्या मृत्यूनंतर विधवा विहिनीशी विवाह करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. याची किंमत त्याला आपला जीव देऊन चुकवावी लागली आहे. ही घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील आहे. विशेष म्हणजे त्याला मारणारे त्याचेच कुटुंबीय आहेत. कुटूंबीयांनी त्याची निघृण हत्या करत मृतदेह एका बागेत फेकला. 

पोलीस हत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर सासरवाडीच्या लोकांनी आरोप केला की, त्याच्या घरच्या लोकांनीच त्याची हत्या करून मृतदेह फेकून दिला आहे.

८ वर्षापूर्वी झाला होता विवाह -

विधवा वहिनीशी विवाह करणाऱ्या लहान दीराला मृत्यूदंड दिला आहे. आरोपी दुसरे-तिसरे कोणी नसून त्याचे कुटूंबीयच आहेत. तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह चादरीत गुंडाळून घरापासून ५००  मीटर अंतरावर असलेल्या एका बागेत फेकला. ही घटना वैशाली जिल्ह्यातील बेलसर पोलीस ठाणे क्षेत्रातील साइन गावातील आहे. मृत तरुण साईन गावात राहणारा होता. त्याचे नाव राम कुमार महतो होते. रामचा विवाह मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कुढनी येथील किशुनपूर मोहनी गावातील तरुणीशी झाला होता.

राजकिशोर सिंह यांनी आपली मुलगी नीतू हिचा विवाह ८ वर्षापूर्वी राम याच्याशी लावून दिला होता. मृताचा मेव्हुणा विकास कुमार यांनी सांगितले की, त्याच्या दाजीचा १० वर्षापूर्वी एका अपघातात मृत्यू झाला होता. भावाच्या मृत्यूनंतर राम याने आपल्या विधवा बहिणीशी विवाह केला होता.

कुटूंबीय लग्नाच्या विरोधात होते -

पतीच्या मृत्यूनंतर नीतू एकटी पडली होती. पतीच्या मृत्यूनंतर दोन वर्षे ती सासरीच राहिली. त्यानंतर राम याने आपल्या वहिनीशीच विवाह केला. मात्र राम आणि नीतूच्या विवाहास घरच्या लोकांची परवानगी नव्हती. कुटूंबीय त्यानां त्रास देत होते तसेच या पती-पत्नीला मारहाणही करत होते. घरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून रामने पत्नीला माहेरी पाठवला व स्वत: मजुरी करण्यासाठी नेपाळला निघून गेला.

दोन दिवसापूर्वीच आला होता -

घटनेच्या दोन दिवस आधीच राम आपल्या घरी आला होता. घरी येताच त्याचा घरच्या लोकांच्या वाद झाला. रामच्या सासरवाडीच्या लोकांनी आरोप केला की, त्याची हत्या केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. मृताच्या घरच्या लोकांनी सांगितले की, तो सासरीच रहात होता. त्याने स्वत: फासी घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सांगितले की, हत्या की आत्महत्या याचा तपास केला जात आहे.

विभाग