Viral News : मेटाचे मालक मार्क झुकेरबर्ग यांनी नुकतेच फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या मेटा प्लॅटफॉर्ममध्ये मोठा धोरणात्मक बदल करण्याची घोषणा केली आहे. एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी हा या बदलांबाबत माहिती दिली आहे. या व्हिडिओत, त्यांनी सांगितले की, कंपनी यापुढे थर्ड पार्टी फॅक्ट-चेकर्ससोबत मिळून काम करणार नाही. त्यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या मनगटावर एक अतिशय महागडं घड्याळ घातलं होतं. सध्या त्यांच्या या घडाळ्याची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. या घडाळ्याची किंमत तब्बल ९ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ७.७ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
सोशल मीडियावर या घड्याळाविषयी नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. फेसबुकच्या कम्युनिटी नोट्स अनाउंसमेंट व्हिडिओमध्ये झुकेरबर्गने १० लाख डॉलरचे घड्याळ घातले होते, असे एका व्हेंचर कॅपिटलिस्टने ट्विट केलं आहे. हे घड्याळ बहुतेक लोकांच्या घरांपेक्षा महाग आहे. असे काही नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर म्हटलं आहे.
एका युजरनं लिहिलं की, मार्क झुकेरबर्गने इतके महागडे घड्याळ का घातले होते हे कोणाला माहित आहे का? नाही ना? जे घडयाळ मार्कने घातले आहे, त्याची किंमत ही अनेकांच्या घराच्या किंमतीपेक्षाही जास्त आहे.
तर एका युजरने म्हटलं की, "तुम्हाला आठवतंय का जेव्हा मार्क झुकेरबर्गने अनंत अंबानींच्या घड्याळाचं कौतुक केलं होतं? बरं, आता त्याच्याकडे तेच महागडे घड्याळ आहे.
मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चॅन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. एका व्हायरल व्हिडिओमध्ये झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी अनंत अंबानीयांच्या घड्याळाचे कौतुक करताना दिसत आहेत.
ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, झुकेरबर्गने परिधान केलेले घड्याळ ग्रीबेल फोर्सी 'हँड मेड १ ' या कंपनीचं होतं. हे अत्यंत दुर्मिळ आणि महागडं घड्याळ आहे. वर्षभरात केवळ दोन-तीन मॉडेल तयार केले जातात. यापूर्वी झुकेरबर्ग पॅटेक फिलिप आणि एफपी जॉर्न सारख्या लक्झरी ब्रँडची घड्याळे परिधान करताना दिसला आहे.
ग्रीबेल फोर्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल निडेगर म्हणाले, "डिजिटल जग आणि जीवनशैलीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीच्या मनात आजही पारंपारिक कारागिरांबद्दल आदर आहे, हे पाहून आनंद होत आहे. हे घड्याळ त्यांची कृतज्ञता दाखवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या