मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कोरोनानंतर Marburg Virus ने वाढवले टेन्शन, दोघांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट

कोरोनानंतर Marburg Virus ने वाढवले टेन्शन, दोघांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 19, 2022 01:58 PM IST

आता मारबर्ग नावाच्या व्हायरसने आता डोकं वर काढलं आहे. यासंदर्भात WHO कडून अलर्टही देण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (फोटो - एएफपी)

Marburg Virus : जगात गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अद्याप अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यातच आता नव्या एका विषाणूने टेन्शन वाढवले आहे. अडीच वर्षांच्या काळात जगाने लॉकडाऊनचा भयंकर असा अनुभव घेतला आहे. कोट्यवधी नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. दरम्यान, आता मारबर्ग नावाच्या व्हायरसने आता डोकं वर काढलं आहे. यासंदर्भात WHO कडून अलर्टही देण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात मारबर्ग व्हायरसमुळे घाना देशात दोघांचा मृत्यू झाल्याचं स्काय न्यूजने म्हटलं आहे. मृत्यू झालेल्या दोघांनाही मारबर्गची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आता या दोघांच्याही संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला असून त्यांना क्वारंटाइन केलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून यासंदर्भात इशारा देण्यात आला आहे. मारबर्ग विषाणूबाबत तात्काळ खबरदारी घ्यावी. जर खबरदारी घेतली गेली नाही तर या विषाणूच्या प्रसारामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते असं WHO ने म्हटलं आहे.

कोरोनाप्रमाणेच हा विषाणू असून तो वटवाघुळांमुळे होतो. तज्ज्ञांनी असंही सांगितलं की, या विषाणूच्या लागण झालेल्या प्राण्यापासून मानवामध्ये याचा संसर्ग झाल्यानंतर एकाकडून तो दुसऱ्याला होऊ शकतो. मारबर्गची लागण होण्याचा धोका आणि त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता ही ८८ टक्क्यांहून जास्त असू शकते. इबोला फॅमिलीतील हा विषाणू असून त्याचे संक्रमण हे इबोलापेक्षा वेगाने होत असल्याचं म्हटलं जात आहे. १९६७ मध्ये या विषाणूचा पहिला संसर्ग जर्मनीमध्ये झाल्याचं आढळून आलं होतं.

मारबर्गच्या लक्षणांबाबतही माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. यानुसार लक्षणे दिसण्यासाठी २ ते २१ दिवस लागतात. यामध्ये ताप, थंडी, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसतात. वेळीच यावर उपचार न झाल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त, शरीरातील द्रव यांच्या संपर्कात येऊन हा संसर्ग इतरांमध्ये पसरू शकतो. तसंच संक्रमित व्यक्तीचे कपडे आणि अंथरूण वापरल्यानेही संसर्गाचा धोका आहे.

रुग्णांवर उपचार म्हणून त्याला द्रवयुक्त आहार देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसंच संसर्ग झालेल्या व्यक्तीशी थेट संपर्क करू नये. तसंच त्याच्या परिसरात असाल तर हातमोजे, मास्क इत्यादी घालणं गरजेचं आहे. याशिवाय संसर्ग झालेल्या व्यक्तीला क्वारंटाइन करणे आणि त्याने वापरलेल्या वस्तूंच्या संपर्कात येऊ नये असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग