Live News Updates 17 August 2023 : रेल्वेत चार प्रवाशांची हत्या करणारा आरपीएफ जवान चेतन सिंह सेवेतून बडतर्फ
Live News Updates 17 August 2023 : जयपूर-मुंबई रेल्वेत वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य तीन प्रवाशांना गोळ्या घालून ठार मारणारा आरपीएफ जवान चेतन सिंह याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
Thu, 17 Aug 202306:18 AM IST
Chetan Kumar Singh : रेल्वेत चार प्रवाशांची हत्या करणारा आरपीएफ जवान चेतन सिंह सेवेतून बडतर्फ
Chetan Kumar Singh : जयपूर-मुंबई रेल्वेत वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य तीन प्रवाशांना गोळ्या घालून ठार मारणारा आरपीएफ जवान चेतन सिंह याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. सध्या पोलिसांकडून चेतनची चौकशी सुरू असून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यातच आता त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे.
Thu, 17 Aug 202306:14 AM IST
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Updates : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने १९ ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मुंबई आणि ठाणे शहरात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Thu, 17 Aug 202306:12 AM IST
Pune Fire Incident : पुण्यातील ज्वेलरी शॉपमध्ये भीषण आग
Fire Incident In Piyush Jewellers Pune : पुण्यातील वानवडी परिसरातील पीयूष ज्वेलरी शॉपमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीताहानी झाली नाही. परंतु ज्वेलरी शॉपमधील लाखो रुपयांचं साहित्य आणि दागिने बेचिराख झाले आहे.
Thu, 17 Aug 202312:53 AM IST
Kishor Patil Bhadgaon : शिंदे गटाला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Shinde Group : सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या भडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यात अनेक जेष्ठ नेते तसेच पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळं आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
Thu, 17 Aug 202312:52 AM IST
Delhi News : इंडिया आघाडीत काँग्रेस-आपमध्ये संघर्षाची चिन्हं; जागावाटपावरून पेटणार वाद?
Congress vs AAP : विरोधकांच्या इंडिया आघाडीत वादाची पहिली ठिणगी पडली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सात जागांवर निवडणूक लढण्याचं वक्तव्य काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळं आपचे नेते नाराज झाले असून दोन्ही पक्षात संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळं आता आप इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.