मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 12 June 2023 : मानहानी प्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा राहुल गांधींना २ ऑगस्‍टपर्यंत अंतरिम दिलासा
Live News Updates 12 June 2023
Live News Updates 12 June 2023

Live News Updates 12 June 2023 : मानहानी प्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा राहुल गांधींना २ ऑगस्‍टपर्यंत अंतरिम दिलासा

Atik Sikandar Shaikh 01:23 PM ISTJun 12, 2023 06:53 PM
  • twitter
  • Share on Facebook

Live News Updates 12 June 2023 : मानहानी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधींच्‍या अंतरिम दिलासात वाढ केली आहे.

Mon, 12 Jun 202301:22 PM IST

मानहानी प्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा राहुल गांधींना २ ऑगस्‍टपर्यंत अंतरिम दिलासा

मानहानी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधींच्‍या अंतरिम दिलासात वाढ केली आहे. न्यायालयाने आज ( दि.१२ ) त्‍यांना न्यायालयासमोर हजर राहण्यापासून दिलेला अंतरिम दिलासा २ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती एस व्ही कोतवाल यांच्या एकल खंडपीठासमोर झाली. ही सुनावणी पुढे ढकलत यापूर्वी राहुल गांधींना दिलेला अंतरिम दिलासा २ ऑगस्टपर्यंत कायम राहील, असे न्‍यायमूर्ती कोतवाल यांनी स्‍पष्‍ट केले.

Mon, 12 Jun 202310:43 AM IST

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक

बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा  मुंबई आणि गुजरातच्या किनाऱ्याला बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावून चक्रीवादळासंबंधी माहितीचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेते आणि अधिकारी उपस्थित होते.

Mon, 12 Jun 202309:55 AM IST

Elon musk : एलन मस्कने दिली १४ वर्षाच्या मुलाला 'स्पेस एक्स'मध्ये नोकरी 

आजकाल मुलांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. कारण केवळ १४ वर्षाच्या मुलाला एलन मस्कने त्याची कंपनी स्पेस एक्समध्ये नोकरी दिली आहे. ज्या कंपनीत लाखो लोकं नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात, त्याच कंपनीत कायरन क्वाझी मुलाला मस्कने चक्क साॅफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी दिली आहे. तो या कंपनीत सर्वात लहान वयाचा इंजिनिअर बनला आहे. कायरनने स्वत: च आपल्या लिंकडिन आणि इन्स्टा पोस्टवर ही माहिती दिली आहे.

Mon, 12 Jun 202307:14 AM IST

आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

मुंबईः आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या दक्षिण मुंबई विभागातर्फे चर्चगेट स्टेशन बाहेर भजन म्हणत आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Mon, 12 Jun 202305:18 AM IST

Raj Thackeray : झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या, वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Raj Thackeray HBD : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांना मोठं आवाहन केलं आहे. कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन न येता झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन भेटीस, यावं असं आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आहे.

Mon, 12 Jun 202304:36 AM IST

Opening Bell : सेन्सेक्सची धडाकेबाज सुरुवात, निफ्टीतही ४० अंकांची वाढ 

सोमवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सकाळी ९:१६ वाजता बीएसई सेन्सेक्स १४८.४३ अंकांच्या किंवा ०.२४ टक्क्यांच्या वाढीसह ६२,७७४.०६ अंकांवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी ४०.८५ अंकांच्या म्हणजेच ०.२२ टक्क्यांच्या वाढीसह १८,६०४.२५ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टीच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीपीसीएल आणि टाटा मोटर्स एक टक्क्याहून अधिक वाढीसह व्यवहार करत होते. त्याच वेळी, डिव्हिज लॅबमध्ये १.८२ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

Mon, 12 Jun 202303:57 AM IST

कोकणासह मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळ पुढील काही तासांत मुंबईसह कोकणच्या किनारी भागांत धडकण्याची शक्यता आहे. त्यातच आता मान्सून राज्यात दाखल झाल्याने कोकणासह मुंबई व ठाण्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Mon, 12 Jun 202302:55 AM IST

Sharad Pawar : मोठी बातमी, शरद पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

Sharad Pawar Threat Case : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी सौरभ पिंपळकर याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने आरोपीला १३ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mon, 12 Jun 202302:55 AM IST

Maharashtra Weather Update : मान्सून कोकणात दाखल, पुढील २४ तासांत राज्यात पावसाचा इशारा

Weather Update Maharashtra : यंदाच्या हंगामातील मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्राच्या किनारी भागांत मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळं पुढील २४ तासांत कोकणासह राज्यातील अन्य भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Mon, 12 Jun 202302:53 AM IST

Amalner Violence : अमळनेरमध्ये दोन गटात राडा, शहरात जमाबंदी लागू

Amalner Violence : राज्यातील अनेक शहरांमधून हिंसाचाराच्या घटना समोर येत असतानाच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली आहे. सध्या शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे.