सरकारी रुग्णालयात कुत्र्यांनी लचके तोडलेला बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ, वरच्या मजल्यावरून कोसल्याने मृत्यूचा संशय-mans body eaten by dogs found from govt hospital at bettiah ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सरकारी रुग्णालयात कुत्र्यांनी लचके तोडलेला बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ, वरच्या मजल्यावरून कोसल्याने मृत्यूचा संशय

सरकारी रुग्णालयात कुत्र्यांनी लचके तोडलेला बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ, वरच्या मजल्यावरून कोसल्याने मृत्यूचा संशय

Aug 26, 2024 10:48 PM IST

बिहारमधील बेतिया जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडले होते. सोमवारी सकाळी ब्लॉक-सीच्या अंगणात हा छिन्नविछिन्न मृतदेह आढळला होता.

भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे लटके तोडले (HT FILE)
भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे लटके तोडले (HT FILE)

बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात कुत्र्यांच्या टोळक्याने खाल्लेल्या एका मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह सोमवारी बेवारस अवस्थेत आढळून आला. लचके तोडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

जीएमसीएचच्या अधीक्षक सुधा भारती यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी ब्लॉक-सीच्या अंगणात छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाचे काही भाग प्राण्यांनी, शक्यतो कुत्र्यांनी खाल्ले होते. याची पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली.

मृत रुग्ण कोण होता, त्याचा मृत्यू कसा याची आम्हाला कल्पना नाही, असे अधीक्षकांनी सांगितले. बेतिया शहराचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) मनोज कुमार सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह ७२ तास रुग्णालयात ठेवण्यात आला असून दावेदाराच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहिती एसएचओ यांनी दिली.

मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडले होते. जीएमसीएच रुग्णालयातील वरच्या मजल्यावरून पडून या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुग्णालयाच्या आवारात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. तरुणाचा मृतदेह रुग्णालयाच्या कंट्रोल रूमच्या मागील बाजुस आढळला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणावर जीएमसीएचमध्ये उपचार सुरू होते. तो मानसिक दृष्ट्या आजारी होता. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. रुग्णालय व्यवस्थापक शाहनवाज यांनी सांगितले की, वरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कुत्र्यांनी त्याच्या मृतदेहाचे लचके तोडले. त्यानंतर रुग्णालय गार्डने कुत्र्यांना पळवून लावले. पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. 

सोमवारी सिक्युरिटी गार्ड रुग्णालयाच्या मागील बाजुला गेले होते. त्यांना दिसले की, तेथे एका तरुणाचा मृतदेह पडला होता. परिसरातील भटकी कुत्री त्या मृतदेहाचे लचके तोडत होते. याची माहिती त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिली. पोलिसांनी सांगितले की, जीएमसीएच कंट्रोल रूमच्या मागे एका तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून ७२ तासांसाठी रुग्णालयात ठेवले आहे. मृत तरुणाचे वय सुमारे २६ वर्षे आहे.

विभाग